विधानसभा निवडणुकांचे वेध सर्व राजकीय पक्षांना लागले आहेत.
त्यासाठी, रणनिती आखायला आणि विधानसभा मतदारसंघांची
चाचपणी करायला देखील सुरुवात झाली आहे. अनेक पक्षांच्या
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
नेत्यांचे राजकीय दौरे व गाठीभेटीही पाहायला मिळतात. त्यातच,
लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा
मोठा फटका महायुतीला बसला असून महाविकास आघाडीला
फायदा झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे, जरांगे यांच्या भेटीसाठी नेतेमंडळींची
रांग लागल्याचं दिसून येतं. आता, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे
वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे
यांची भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, यावरुन तर्क वितर्क सुरू आहेत.
मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकांसाठी रणनिती आखायला सुरुवात केली
असून विधानसभेत उमेदवारच उभा करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे.
विशेष म्हणजे 29 ऑगस्ट रोजी ते यासंदर्भातील निर्णयही जाहीर करणार होते,
मात्र विधानसभा निवडणुका लढवण्यासंदर्भातील घोषणेची तारीख पुढे ढकलली आहे.
त्यामुळे, जरांगे खरंच निवडणूक लढवणार आहेत की, गत निवडणुकांप्रमाणे
कोणाला तरी पाडा म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत,
याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यातच, आज पृथ्वीराज चव्हाण
यांनी अंतरावाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली.
या भेटीत मराठा आरक्षण व विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने चर्चा झाल्याची माहिती आहे.
या भेटीचा आगामी निवडणुकीवर काय प्रभाव पडतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/punyaat-mpsc-agitator-arrested/