मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित!

जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी या गावात मराठा आंदोलक

मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरु आहे. आज त्यांच्या

उपोषणाचा नववा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे.

Related News

अशातच मराठा बांधवांशी मनोज जरांगे यांनी संवाद साधला.

यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाची मागणी पुन्हा एकदा आग्रहाने

मांडली. आपल्या जातीशी, आपल्या लेकरांशी धोका करून पुन्हा

नेत्यांच्या मुलांना मोठं करू नका, एवढीच माझी आपल्याला विनंती

आहे, असं जरांगे म्हणाले. एकाही नेत्याच्या सभेला जायचे नाही.

कोण्या नेत्याने दबाव आणला लोकसभेला जसे मराठ्यांनी केले

तसे करायचे. न्यायालयाच्या आदेशानुसार उपोषण उपचार घेऊन

उपोषण करण्यापेक्षा उपोषण सोडावे का? असा प्रश्न मनोज जरांगे

पाटील यांनी मराठा समाजाला विचारला. त्यानंतर समाजाने त्यांना

सकारात्मकता दाखवली. त्यानंतर जरांगे पाटील 5 वाजता उपोषण

सोडणार आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज

मुस्लिम समाज बांधवांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी तब्येतीची

काळजी घ्यावी अशी विनंती केली. यावेळी या मुस्लिम बांधवांना

अश्रू अनावर झाले होते.

Read also: https://ajinkyabharat.com/big-gift-to-yogi-government-employees/

Related News