मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी मराठा
आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मागच्या सात
दिवसांपासून उपोषण करत आहेत. जालन्यातील अंतरवली
Related News
चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी सोपे घरगुती उपाय….
कांगो नदीत भीषण बोट दुर्घटना;
फ्लोरिडा विमानतळावर थरारक क्षण;
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
सराटीत त्यांचं उपोषण सुरु आहे. आज या उपोषणाच्या सातव्या
दिवशी आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी स्वराज्य
पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे अंतरवली सराटीमध्ये पोहचले
आहेत. संभाजीराजे उपोषणस्थळी येत मनोज जरांगेंच्या तब्येतीची
चौकशी केली आहे. या उपोषणस्थळावरून संभाजीराजे यांनी
सरकारला इशारा दिला आहे. मनोज जरांगेंना काही झालं तर
सरकार जबाबदार असेल, असा इशारा संभाजीराजे यांनी
सरकारला दिला आहे. मनोज जरांगे पाटील हे या वर्षात सहाव्यांदा
आंदोलन आणि आमरण उपोषणाला बसले आहेत. राज्यातील
इतिहासातील शरमेची बाब आहे. एक व्यक्ती समाजाला न्याय
मिळवून देण्यासाठी जीवाची बाजी लावायला बसला आहे. त्याची
दखल किंबहूना त्यावरचा निर्णय या सरकारने घेतलेला नाही. मी
डॉक्टर्सकडून सर्व रिपोर्ट घेतले आहेत. परवा रायगडवर मी गेलो
होतो. त्यावेळी मला कळलं की मनोज जरांगे यांची तब्येत
खालावली आहे. त्यामुळे मी त्यांना पाहण्यासाठी प्रकृतीची
विचारपूस करण्यासाठी आलो आहे. मनोज जरांगेंचा जीव
तुमच्यासाठी आहे. त्यांचा जीव महत्त्वाचा आहे. त्यामुळे मी त्यांना
पाहायला आलोय. मला दु:खी वाटतं. वेदना होत आहे. एवढी
तब्येत खालावूनही… आता तर त्यांनी सलाईन घ्यायचं बंद केलं
आहे, असं संभाजीराजे म्हणाले.
Read also: https://ajinkyabharat.com/public-meeting-in-sharad-pawaranchi-chiplun/