मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांची
तब्येत खालावली आहे. यापूर्वी सुद्धा त्यांची तब्येत बिघडली होती.
त्यानंतर मंत्री शंभुराज देसाई यांच्या आग्रहाने त्यांना रात्रीच्यावेळी
Related News
अकोला शिक्षण विभागाने सत्र सुरू
- By अजिंक्य भारत
धाबा येथील शासकीय विश्राम गृह मध्ये शॉक सर्किट मुळे आग लागल्याची घटना घडली…..
- By अजिंक्य भारत
शहरात नाताळ सण मोठ्या उत्साहात संपन्न…
- By अजिंक्य भारत
एमआयडीसीतून ट्रक पळविला गुन्हा दाखल…
- By अजिंक्य भारत
बौद्ध समाज संघर्ष समितीच्या वतीने अशोक वाटिका येथे मनुस्मृतीचे दहन करण्यात आले.
- By अजिंक्य भारत
वाडेगाव अकोला टी पॉईंट येथे दुचाकीस्वराचा अपघात.
- By अजिंक्य भारत
आकाशदादा फुंडकर भाजपा ग्रामीण व नागरीकाकडून भव्य सत्कार
- By अजिंक्य भारत
जिंगल बेल…जिंगल बेल..जिंगल ऑल द वे ची धून गात देशभरात ख्रिश्चन बांधवांनी ख्रिसमस उत्साहात साजरा केलाय…
- By अजिंक्य भारत
अकोल्यामध्ये प्रभू येशूंच्या जन्मोत्सवाची धूम पाहायला मिळत आहेय…
- By अजिंक्य भारत
पानी फाउंडेशन महिला शेतकरी गटांनी श्रमदानातून केला वनराई बंधारा
- By अजिंक्य भारत
Rey Misterio Sr Death : प्रसिद्ध कुस्तीपटूचं निधन, रे मिस्टेरियो सीनियर यांनी वयाच्या 66 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
- By अजिंक्य भारत
शिवनी विमानतळ विस्ताराचा गुंता अजूनही सुटला नसून धावपट्टीची लांबी ११०० मीटरने वाढवावी लागणार आहे
- By अजिंक्य भारत
सलाईन लावण्यात आले होते. आज दुपारी त्यांची तब्येत पुन्हा
खालावली. यावेळी महिलांच्या डोळ्यातून अश्रुधारा येत होत्या.
त्यांच्या टाहोमुळे वातावरण धीरगंभीर झाले. महिलांनी त्यांना
उपोषण मागे घेण्याची विनंती केली. पण जरांगे पाटील त्यांच्या
मागणीवर ठाम आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाडा
मुक्ती संग्राम दिनाच्या एक दिवस अगोदर 16 सप्टेंबरपासून
उपोषणाचे हत्यार उपसले. त्यांच्या आंदोलनाला एक वर्ष उलटून
गेले आहे. सरकारने त्यांना जी आश्वासनं दिली. त्यातील काहींची
अंमलबाजवणी झाली नाही. मुंबईच्या वेशीवर सरकारने
सगेसोयऱ्याचा अध्यादेश आणि ओबीसीमधून आरक्षणाची
अंमलबजावणी करण्याचे आश्वासन देऊनही गेल्या सहा महिन्यात
त्यावर काहीच कारवाई झाली नसल्याने मनोज जरांगे पाटील यांनी
पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसले. आज त्यांची तब्येत खालावली.
अंतरवाली सराटीत जरांगे पाटील यांची तब्येत घसरल्याने
महिलांसह आबालवृद्ध भावुक झाले आहेत. जरांगे पाटील यांनी
उपोषण मागे घेण्यासाठी महिलांनी त्यांना विनंती केली. त्यांनी
यावेळी आक्रोश केला. महिलांना अश्रुधारा आवरता आल्या नाही.
जरांगे पाटील यांनी पाणी प्यावे अशी विनंती त्यांना करण्यात
आली. यावेळी काही महिला मंचावर आल्या. त्यांनी जरांगे पाटील
यांना पाणी पिण्याची विनंती केली. तर खालून पण मोठ्या संख्येने
आंदोलकांनी जरांगे पाटील यांना पाणी पिण्याची विनंती केली.
Read also: https://ajinkyabharat.com/first-journalist-council-of-akshay-shinde-encounter-police/