मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले; फडणवीससाहेबांशी कटुता संपवण्याचे आवाहन

उपोषण संपले, मुंबईतून गावाकडे रवाना

मुंबई : मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषणाच्या पाचव्या दिवशी मनोज जरांगे पाटील

यांनी आपले उपोषण सोडले. या निर्णयामुळे आंदोलनात तणाव कमी झाला असून,

त्यांनी मुख्यमंत्र्यांसह राज्य सरकारच्या मदतीस आभार मानले.

जरांगे पाटील यांनी उपोषण सोडताना म्हटले, “फडणवीससाहेब,

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित दादा आणि आमच्या मराठ्यांमध्ये असलेली कटुता संपवूया.

तुम्ही येथे आले असते, तर ती कटुता संपुष्टात आली असती; नाही आले तर ती कायम राहते.”

उपोषण मागे घेण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांनी हस्तक्षेप केला. त्यांनी सांगितले की,

“आपण हे उपोषण आज सोडूया आणि नंतर मुख्यमंत्र्यांसह बैठकीत चर्चा करूया.”

यावेळी विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार व्यक्त केले,

“त्यांच्या मदतीमुळेच आपण इथे पोहोचलो आणि आपले मागण्या मान्य करू शकलो.”

उदय सामंत यांनी देखील स्पष्ट केले की, मंत्रिमंडळ समितीचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील

यांना सर्व अधिकार देण्यात आले आहेत,

त्यामुळे उपोषण सोडण्याचे निर्णय योग्य पद्धतीने घेतले गेले आहेत.

या उपोषणाच्या समाप्तीनंतर जरांगे पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना आवाहन केले की,

“गाड्या सुरू करा, आता मुंबईतून गावाकडे परत चला.”

Read also : https://ajinkyabharat.com/crime-thriller-28-lakhs-spent-karun-wife-kandala-kandwale-work-permit/