मनोज जरांगे पाटील यांचं मराठा समाजाला आवाहन
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनोज जरांगे पाटील
प्रचंड अॅक्टिव्ह झाले आहेत. मनोज जरांगे पाटील हे राजकीय
Related News
चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी सोपे घरगुती उपाय….
कांगो नदीत भीषण बोट दुर्घटना;
फ्लोरिडा विमानतळावर थरारक क्षण;
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
नेत्यांची गोची करणार असल्याचं चित्र आहे. कोणत्याही राजकीय
नेत्यांच्या सभांना जाऊ नका, असं आवाहनच मनोज जरांगे पाटील
यांनी केलं आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांची गोची होणार असल्याचं
चित्र आहे. मराठा समाजाने आधीच नेत्यांना गावबंदी केली होती.
आता मराठा समाज सभेला नाही आला तर राजकीय पक्षांना बड्या
नेत्यांच्या सभेसाठी गर्दी जमवणं कठिण होणार आहे. मनोज जरांगे पाटील
हे बीडच्या बेलगाव येथे होते. यावेळी त्यांनी बोलताना हा इशारा दिला आहे.
माझं आमरण उपोषण 17 तारखेपासून सुरू होणार आहे. उपोषणापूर्वी
आराम आवश्यक असतो म्हणून उद्यापासून कुठेही कार्यक्रमाला जाणार नाही.
मी मुद्दाम आमरण उपोषण करत नाही. माझा मायबाप समाज आरक्षणाची
आशेने वाट पाहत आहे. समाज म्हणतो आमच्या लेकरांची शेवटची आशा
तुम्ही आहात. सरकार आरक्षण देणार नसेल तर मला माझ्या समाजासाठी
लढावे लागणार आहे. माझा जीव गेला तरी हरकत नाही, असं मनोज जरांगे
पाटील म्हणाले. महाराष्ट्रमध्ये मणिपूर होणार आहे. त्यांना दंगली घडवायच्या
आहेत. पण तुम्ही शांत रहा आणि सावध रहा. त्रास देणाऱ्याला गपागप पडायचे
आहे. मी एका एका काठीचा हिशोब घेणार आहे ( अंतरवाली मधील लाठीचार्ज)
कितीही त्रास झाला तरी हटायचे आणि मतदान केंद्रावर दाखवून द्यायचे आहे.
मराठ्यांनी कोणाच्या सभेला जायचे नाही, असं आवाहनही त्यांनी केलं.
Read also: https://ajinkyabharat.com/ajit-pawar-got-20-candidates/