मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावं – देवेंद्र फडणवीस

मराठा समाजाला

मराठा समाजाला सगेसोयरे आणि

ओबीसी प्रवर्गातून आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी

Related News

अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाच दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत.

मंगळवारी त्यांची प्रकृती खालावली होती,

ग्रामस्थांच्या विनंतीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपचार घेतले.

पण त्यानंतर आज सकाळी बोलताना तोडगा काढला नाही,

तर उपचार घेणार नाही,

अशी आपली भूमिका स्पष्ट केली.

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“आरक्षणाबाबत सरकार सकारात्म आहे, मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं,

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे,

त्याबाबत सरकार गंभीर आहे.

त्यांच्या मागण्यावर सरकार कारवाई करत आहे.

मागच्या काळात आम्ही त्यांना जे आश्वासन दिले,

केसेस परत घेण्याचे ती प्रक्रिया सुरू आहे.

त्यांची मागणी आहे

त्याबाबत देखील सरकारने पहिलं नोटिफिकेशन जारी केलेलं आहे,

त्यावर कार्यवाही सुरू आहे”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ते मुंबईत बोलत होते.

मात्र सगे सोयरेच्या अंमलबजावणीसाठी पाच महिने झालेत.

जर काम करायचे असेल तर एवढा वेळ थोडाच लागतो.

आज संध्याकाळपर्यंत कळेल काय विषय आहे,

नाही कळलं तर सलाईन काढून टाकू,

एखाद्या मंत्र्यावर विश्वास ठेवणे ही माझी चूक आहे का?

असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे.

Read also: लोकसभेच विशेष अधिवेशन २४ जूनपासून (ajinkyabharat.com)

Related News