आज़ादी की सुबह की पहली चाय.. -मनीष सिसोदिया

आप कार्यकर्त्यांनाही

आप कार्यकर्त्यांनाही उभारी

आम आदमी पार्टी नेते मनीष सिसोदिया यांना जामीन मिळाला.

त्यामुळे ते तब्बल 17 महिन्यांनंतर तुरुंगातून बाहेर आले.

Related News

प्रदीर्घ काळानंर मोकळा श्वास घेत असलेल्या सिसोदिया यांनी हा क्षणही साजरा केला.

त्यांनी सोशल मीडियावर एक मार्मिक छायाचित्र सामायिक करून

आपले स्वातंत्र्य अधोरेखीत करण्याचा प्रयत्न केला.

या छायाचित्रात ते आपल्या पत्नीसोबत चाहाचा आस्वाद घेताना दिसत आहेत.

दिल्ली मद्य धोरण प्रकरणाशी संबंधित कथित भ्रष्टाचार प्रकरणामध्ये

त्यांना अटक करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्यांना

जामीन  मंजूर केला. दिल्लीच्या माजी उपमुख्यमंत्र्यांनी हा आनंद पत्नीसोबत चहाचा आस्वाद घेत साजरा केला.

मनिष सिसोदिया यांनी X वर एक खास छायाचित्र सामायिक केले आहे.

हा फोटो शेअर करताना त्यांनी एक खास कॅप्शनही दिले आहे.

कॅप्शनमध्ये त्यांनी “स्वातंत्र्याच्या पहाटेचा पहिला चहा…17 महिन्यांनंतर!”, असे लिहिले आहे.

याच पोस्टमध्ये त्यांनी ”संविधानाने आपल्या सर्व भारतीयांना जगण्याच्या

अधिकाराची हमी म्हणून दिलेले स्वातंत्र्य” असल्याचेही म्हटले आहे.

आपल्या सुटकेचे महत्त्व उल्लेखीत करताना त्यांनी प्रियजनांसोबत मोकळ्या हवेत

श्वास घेण्याच्या स्वातंत्र्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

Read also: https://ajinkyabharat.com/something-big-will-happen-in-india-hindenburgs-tweet/

Related News