गेल्या वर्षभरापासून मणिपूर हिंसाचाराने होरपळत आहे…
ईशान्येकडील या राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी तत्काळ प्रयत्न केले पाहिजेत, असा घरचा आहेर
Related News
“The 50”: वंशज सिंगचा मोठा ‘कमबॅक’ — रिअॅलिटी शोमध्ये थरारक वळण!
टीव्हीवरील चर्चेचा विषय बनलेला आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा रिअॅलिटी शो “The 50
Continue reading
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा जोरात, फडणवीस-शाह भेटीमुळे घडल्या महत्त्वाच्या पाऊले
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या...
Continue reading
Zilla Parishad निवडणूक निकाल 2026: अजितदादांच्या शेवटच्या सभेतील उमेदवार विजयी, राष्ट्रवादीला खेड तालुक्यात मोठं यश
Continue reading
Vastu Shastra : स्वयंपाकघरात चुकूनही ठेवू नका या चार गोष्टी, नाहीतर घरात कधीच टिकणार नाही पैसा
स्वयंपाक...
Continue reading
मुंबई महापालिकेत शिंदे गटाच्या शिवसेनेने देण्यात आलेले कार्यालय नाकारले, काँग्रेसला पुन्हा दिले
मुंबई – मुंबई महापालिकेच्या महायुतीच्या विजयानंतर पक्षांना कार्यालयांचे वाटप सुरू आ...
Continue reading
शुक्राचा कुंभ राशीत प्रवेश: कोणाचे नशीब चमकणार आणि प्रेमात कोणाला मिळणार यश ?
6 फेब्रुवारी 2026 रोजी शुक्र ग्रह कुंभ राशीत प्रवेश...
Continue reading
सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे आणि योग्य पद्धत
सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे ७ चमत्कार...
Continue reading
सोन्याचे भाव लवकरच ७० हजारांपर्यंत? तज्ज्ञांचा सल्ला आणि महत्त्वाची माहिती
सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण : गेल्या काही दिवसांपासून...
Continue reading
दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या विलिनीकरणाच्या चर्चेला गती; छगन भुजबळांचे विधान चर्चेत
महाराष्ट्रातील राजकारणात आता पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या विलिनीकरणाची चर्चा जोर ...
Continue reading
अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीमध्ये मोठा बदल; सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री, पक्षातील निर्णयांमध्ये नवा अध्याय
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नुकतेच एका दुःखद घडामोडीचा सामना ...
Continue reading
मुंबईचा महापौर ठरला! 11 फेब्रुवारीला मतदान – राजकारणामागील मोठ्या हालचाली
मुंबई महानगरपालिकेतील महापौरपदाच्या निवडीच...
Continue reading
“BJP MLA Meeting : मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट संपल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी भाजपने 2 फेब्रुवारीला दिल्लीत आमदारांची रणनीती बैठक बोलावली. जाणू...
Continue reading
सरसंघचालक मोहन भागवत यांनी नवीन भाजपप्रणित रालोआ सरकारला नाव न घेता दिला आहे.
नागपूर : गेल्या वर्षभरापासून मणिपूर हिंसाचाराने होरपळत आहे. ईशान्येकडील या राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी
तत्काळ प्रयत्न केले पाहिजेत, असा घरचा आहेर सरसंघचालक मोहन भागवत यांनी नवीन भाजपप्रणित रालोआ सरकारला नाव न घेता दिला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीय’च्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. हा कार्यक्रम
रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन येथे आयोजित केला होता. यावेळी मणिपूरमधील हिंसाचार व
निवडणुकीबाबत भागवत यांनी आपली परखड मते व्यक्त केली.
ते म्हणाले की, देशात शांतता हवी आहे. प्रत्येक ठिकाणी व समाजात वाद उपयोगाचा नाही. गेल्या
वर्षभरापासून मणिपूर शांततेची वाट पाहत आहे. यापूर्वी तो दहा वर्षे शांत होता. जुन्या काळातील एकोप्याने
राहण्याची संस्कृती नाहीशी झाली असे वाटत आहे. मणिपूरमध्ये हिंसाचार अचानक सुरू झाला की तो मुद्दामहून
सुरू करण्यात आला, हे माहीत नाही. पण त्या आगीत तो अजूनही धुमसत आहे. त्याकडे कोण लक्ष देणार?
आता त्यावर तातडीने उपाययोजना करणे हे आपले कर्तव्य आहे, असे भागवत म्हणाले.
निवडणूक हे युद्ध नसून ती एक स्पर्धा आहे. आता निवडणूक झाली, निकाल लागला. सरकार स्थापन झाले.
तरीही हे कसे घडले? काय झाले?, त्याची चर्चा अजूनही सुरू आहे. आपल्या लोकशाही देशात दर पाच वर्षांनी
निवडणुका होत असतात. प्रत्येक निवडणुकीत आपले कर्तव्य आपण पार पाडतो. यंदाही ते केले आहे, असे भागवत म्हणाले.
विरोधी पक्ष नव्हे ‘प्रतिपक्ष’ म्हणा
निवडणूक सहमती बनवण्याची प्रक्रिया आहे. संसदेत कोणत्याही प्रश्नाच्या दोन बाजू समोर आल्या पाहिजेत.
त्यासाठीच ही व्यवस्था आहे. निवडणूक प्रचारात एकदुसऱ्यावर जोरदार टीका करणे, तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करणे,
खोटी वृत्त प्रकाशित करणे अयोग्य आहे. विरोधी पक्षाला ‘प्रतिपक्ष’ असे म्हटले पाहिजे.
निवडणुकीच्या चष्म्यातून मुक्त होऊन देशासमोरील समस्यांचा विचार करायला हवा, असा सल्ला भागवत यांनी दिला.
Read Also https://ajinkyabharat.com/shri-malanggadavar-dard-krapoon-one-killed-and-two-injured-mulacha-jeev-vachavitaana-unfortunate-death-of-father/