मनिका विश्वकर्मा ‘मिस युनिव्हर्स इंडिया 2025’ विजेती

मनिका विश्वकर्मा ‘मिस युनिव्हर्स इंडिया 2025’ विजेती

मनिका विश्वकर्मा ‘मिस युनिव्हर्स इंडिया 2025’ विजेती

जयपूर – राजस्थानची मनिका विश्वकर्मा हिने ‘मिस युनिव्हर्स इंडिया 2025’चा किताब जिंकला आहे.

18 ऑगस्ट रोजी जयपूरमध्ये झालेल्या अंतिम फेरीत तिला हा मान मिळाला. गतविजेती रिया सिंहाने तिला मुकूट प्रदान केला, तर उत्तर प्रदेशची तान्या शर्मा उपविजेती ठरली.

मनिकाला अंतिम फेरीत महिलांच्या शिक्षण आणि गरीबांना आर्थिक मदत यावर प्रश्न विचारण्यात आला.

त्यावर तिने महिलांचं शिक्षण प्राधान्याचं असल्याचं सांगितलं, आणि हाच तिच्या विजयानं कारण ठरला.

मनिका मूळची राजस्थानच्या श्रीगंगानगरची असून सध्या दिल्लीमध्ये शिक्षण घेत आहे. ती राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विषयाची विद्यार्थिनी आहे.

2024 मध्ये तिने ‘मिस युनिव्हर्स राजस्थान’ किताब पटकावला होता.

आता मनिका थायलंडमध्ये होणाऱ्या 74 व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे.

Read also :https://ajinkyabharat.com/gemini-rashi-malamatashi-related-kamantoon-benefits/