बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे.
पोलिसांनी हेल्मेट घालुन वाहन न चालवणारे,अल्पवयीन दुचाकीस्वार,
विरुद्ध दिशेने वाहन चालविणार्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली आहे.
एकाच दुचाकीवरून तिघांनी प्रवास केल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई केली आहे.
तसेच मद्यप्राशन करून वाहन चालविणार्यावरही कारवाई केल्या जात आहे.
मंगरुळपीर शहर परिसरात दुचाकी चालकांसह ऑटोचालकांवर नियमितपणे कारवाई मोहिम राबविली जाते.
पोलिस वाहतुक शाखेच्यावतीने विशेष मोहिम राबविल्याने महाविद्यालय तसेच खासगी कोचिंग क्लासेस परिसरात
दुचाकीवर ट्रिपलसीट अथवा नियमबाह्य दुचाकी चालविणार्यांची संख्या घटली.
ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रिपलसीट, बुलेटला आवाजाचे सायलेंसर बसविणे, स्टंट करणे,
कट मारणे, फ्ॅन्सी नंबर प्लेट बसविणे अशा दुचाकीस्वारांविरोधात कारवाई मोहिम राबविली होती.
यातून दंड वसुल करण्यात आला होता. त्याचबरोबर काही तरूणांच्या दुचाकीही जप्त केल्या होत्या.
त्यामुळे शहरात नियमबाह्यरित्या दुचाकी चालविणार्यांवर पोलिसांची वचक बसली आहे.
परिणामी सध्या ट्रीपलसीट तसेच नियमांचे उल्लंघन करणार्यांची संख्या घटली आहे.
पोलिसांच्या या मोहिमेचे सर्वञ कौतुक होत आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/akot-shaharat-mokat-janavrancha-trus-citizen-passionate-prashassnache-rare/