प्रत्येकाला जगण्यासाठी प्राणीवायू अर्थात ऑक्सिजनची गरज असते. आणि तो देण्याचे काम झाडे म्हणजेच वृक्ष करत असतात, हे सर्वांनाच मान्य आहे.
मात्र, शहरीकरणाच्या नादात अनेक ठिकाणी झाडे तोडले जातात आणि प्रदूषण वाढीला वाव मिळतो. त्याचा कळत-नकळतपणे सर्वांवर परिणाम होतो.
त्यापासून वाचण्यासाठी झाडे लावणे आवश्यक आहे.मंगरुळपीर येथील पोलीस स्टेशन परिसरात महिला समुपदेशन केंद्राच्या पुढाकारातुन वृक्षारोपन करण्यात आले.
वृक्षारोपणही काळाची गरज आहे, यात शंकाच नाही. पण, वृक्षारोपणासह वृक्षसंवर्धन हे अत्यंत महत्त्वाचे आहे. हीच महत्त्वाची बाब लक्षात घेऊन महिला
समुपदेशनच्या पुढाकारातुन मंगरुळपीर पोलिस स्टेशन परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपणासोबतच वृक्षसंवर्धन करण्याचा ध्यास घेतला.
पर्यावरण अबाधित ठेवण्यासाठी वृक्षसंवर्धनासाठी स्तुत्य पुढाकार घेतल्याने सगळीकडे त्यांचे कौतुक होत आहे.
दरम्यान, ग्लोबल वाॅर्मिंगमुळे वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. मानवी आक्रमणामुळे जंगलतोड वाढल्याने वन्यजीव, पशुपक्षी वातावरणाला धोका निर्माण झाला आहे.
वृक्षतोड हे याचे प्रमुख कारण आहे. परिणामी, अलीकडे मानवाला याचे महत्त्व कळले असून, वृक्षारोपण करण्याकडे अधिकाधिक भर दिला जात आहे. वृक्षारोपण हे महत्त्वाचे आहेच.
पण, त्यासोबत त्याचे संवर्धन ही खरी काळाची गरज आहे. वृक्षाचे संवर्धन झाले तरच भविष्यातील पर्यावरण अबाधित राहील. वृक्षारोपणासोबतच वृक्षसंवर्धन करावे,
असे आवाहनही यावेळी करण्यात आले.यावेळी महिला समुपदेशन केंद्र पोलीस स्टेशन मंगरूळपीर जिल्हा वाशिम यांचेसह ठाणेदार किशोर शेळके,एपिआय गणेश काळे,
पिएसआय ज्ञानेश्वर धावडे,संरक्षण अधिकारी आर एन सुरजुसे ,महिला समुपदेशन केंद्र पोलीस स्टेशनचे कर्मचारी संतोष भगत पोलिस कर्मचारी रमेश जाधव,प्रमोद थोरवे,
प्रमोद वानखडे,प्रवीण माळकर,मनीष आढे, संतोष बारड,रफिक मांजरे,विनोद मनवर, योगेश भातुलकर पञकार तसेच सामाजीक कार्यकर्ते ओंकार खिराडेसह इतर पोलिस कर्मचारी हजर होते.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206