मंगरूळ कांबे गावाकडे जाणारा रस्ता दयनीय अवस्थेत

रस्ता अत्यंत दयनीय अवस्थेत

२० वर्षांपासून डांबरीकरणाची मागणी

मुर्तिजापूर – मंगरूळ कांबे गावाकडे जाणारा सार्वजनिक रस्ता अत्यंत दयनीय अवस्थेत आहे.

तब्बल २० वर्षांपासून या रस्त्याचे डांबरीकरण केले गेलेले नाही, त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे.

रस्त्यावर मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो.

पावसाळ्यात रस्त्यात  चिखल आणि पाणथळ होतो, ज्यामुळे पायी चालणाऱ्या नागरिकांवर तसेच दोनचाकी वाहनधारकांवर अपघाताचा धोका वाढतो.

ग्रामस्थांच्या तक्रारीनंतरही प्रशासनाने साधा मुरुम टाकण्याचा प्रयत्नही केला नाही. रस्त्याची बिकट परिस्थिती पाहता ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.

Read also : https://ajinkyabharat.com/dhurandhar-setwar-mass-poisoning/