कुरणखेड – पिंपळखुटा येथील करण वानखडे (वय २२) हा युवक
मन नदीत पोहण्यासाठी गेला असता,
३० ऑगस्ट रोजी पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेला होता.
मागील दोन दिवसांपासून वंदे मातरम् आपत्कालीन शोध व बचाव पथक कुरणखेड,
आपदा मित्र कपिल ताले व त्यांच्या चमूने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी
संदीप साबळे व सुनील कल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली अथक शोधमोहीम राबविली.
शेवटी, आज रविवार दि. ३१ ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन
वाजता शहापूर येथे करण वानखडे याचा मृतदेह आढळून आला.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून वानखडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/mundgavat-central-banche-daptari-keshav-lahane-yana-retirement-for-retirement/