“ममता बॅनर्जीची पॉलीग्राफ टेस्ट करा”, भाजपाचा हल्लाबोल

कोलकाता

कोलकाता प्रकरणावरून भाजपाचा जोरदार हल्लाबोल

कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि

हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्या

Related News

घटनेवर देशभरात संताप व्यक्त होत आहे. या मुद्द्यावरून

राजकारण सुरू आहे. कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणी

भाजपाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना घेरलं आहे.

भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवर कोलकाता पोलीस आयुक्त

आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी

गौरव भाटिया यांनी केली आहे.

गौरव भाटिया म्हणाले की, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पोलीस आयुक्तांची

पॉलीग्राफ टेस्ट व्हायला हवी. गौरव भाटिया यांनी नबन्ना येथील विद्यार्थ्यांची

रॅली रोखल्याबद्दल ममता सरकारवरही हल्लाबोल केला आणि जे सत्याच्या

पाठीशी उभे आहेत त्यांच्यावर पोलीस कारवाई करत आहेत असं म्हटलं.

“सत्य बाहेर आले पाहिजे. सत्य दाबलं जाऊ शकत नाही आणि सर्वात

मोठी गोष्ट म्हणजे हे लोक आपल्या पदावर बसून विद्यार्थ्यांना चिरडत आहेत,

संविधानाचा अपमान करत आहेत, हे खपवून घेतलं जाणार नाही,

हा मुद्दा आज जसा उचलला गेला आहे तसाच तो पुढेही उचलला जाईल”

असं गौरव भाटिया यांनी सांगितलं.

Read also: https://ajinkyabharat.com/pandharpuratil-bhima-river-pur/

Related News