संग्रामपूर प्रतिनिधी-
वारी हनुमान येथील डोहात बुडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना आज 11 जुलै रोजी दुपारी 2.30
वाजताचे सुमारास घडली. मृतक युवकाचे नाव अक्षय सिध्दार्थ भोजने रा. तेल्हारा असे आहे.
Related News
जन सुरक्षा की भाजप सुरक्षा विधेयक उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
डाबकी रोड पोलिसांची गोवंश रक्षण कारवाई
आमदार संजय गायकवाड अडचणीत; कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल,
पिंपरी-चिंचवडचे नामकरण ‘राजमाता जिजाऊनगर’ करावे – विधानसभेत आमदार उमा खापरे यांची ठाम मागणी
C-390 विमाने आता भारतातच; महिंद्रा आणि एम्ब्रेअरमध्ये सामरिक भागीदारी
गुरुग्राममध्ये हृदयद्रावक घटना: वडिलांच्या गोळीबारात उदयोन्मुख टेनिसपटू राधिकाचा मृत्यू
बार्शीटाकळीतील साडेसात कोटींचा रस्ता दोन महिन्यात उखडला;
ओडिशात ५वी व ८वीच्या विद्यार्थ्यांसाठी पास-फेल पद्धत पुन्हा लागू;
बार्शीटाकळीच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिमानास्पद सन्मान
“गुरुपौर्णिमेला शिंदेंची दिल्ली वारी, शाहांच्या चरणांवर टीका” – संजय राऊतांचा हल्लाबोल
सर्पदंश झालेल्या युवा शेतकऱ्याला पिंजर ते अकोला 40 मिनटातच केले रुग्णालयात दाखल
विद्यार्थ्यांनी इंडियन टॅलेंट ओलंपियाड परीक्षेमध्ये घवघवीत यश
यासंदर्भात वृत्त असे की, मयत नामे अक्षय सिध्दार्थ भोजने वय 23 वर्ष रा.तेल्हारा हा 11 जुलै रोजी सकाळी 10
वाजताच्या सुमारास त्याचे मित्र नामे 1. प्रेम महेंद्र डोंगरे 2. रवीद्र गजानन पोहरकार 3. राहुल रविद्र विरघट सर्व
रा तेल्हारा यांच्यासोबत दर्शनासाठी ग्राम वारी हनुमान मंदीर येथे गेले होते. दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास वारी
हनुमान मंदीराजवळील आड नदीतील राजना डोहामध्ये अक्षय सिध्दार्थ भोजने व त्याचे मित्र हे पोहण्यासाठी गेल होते.
पोहत असतांना अक्षय भोजने याने उंची वरून पाण्यात उडी मारल्याने त्याच्या डोक्याला मार लागुन तो पाण्यात बुडाला व बाहेरच आलाच नाही.
घटनेचे वृत्त कळताच वारी ग्रामस्थानीं त्याचा पाण्यामध्ये शोध घेतला असता त्यांना तो पाण्यामध्ये मृत अवस्थेत मिळुन आल्याने त्याला बाहेर काढले.
अशा फीर्यादीच्या तोंडी रिपोर्ट वरुन मा ठाणेदार चंद्रकांत पाटील यांच्या आदेशाने सदरचा मर्ग दाखल करून तपासकामी पोहेकों शाकीर
पटेल बन 1634 यांच्याकडे देण्यात आला. याप्रकरणी मयत याचा भाऊ अनमोल सिध्दार्थ भोजने वय 33 वर्षे रा. तेल्हारा जि. अकोला
यांनी सोनाळा पोस्टेला दिलेल्या फिर्यादीवरून कलम 194 भान्यासुसं मर्ग दाखल करण्यात आला आहे.