मलकापूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा संताप – आर.सी.सी. भिंतीमुळे गैरसोयी, तातडीने गेट व बुकिंग विंडो उभारणीची मागणी

प्रवाशांचा

मलकापूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा संताप – आर.सी.सी. भिंतीमुळे गैरसोयी, तातडीने गेट व बुकिंग विंडो उभारणीची मागणी

मलकापूर – मलकापूर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्र. २ च्या

बाजूला बांधलेल्या मोठ्या आर.सी.सी. भिंतीमुळे शेकडो

प्रवाशांना प्रचंड त्रास भासत आहे. पंतनगर, एकतानगर, हाश्मी नगर,

कुंड खुर्द, भालेगाव, देवधाबा, धरणगाव, नरवेल, म्हैसवाडी, अनुरावाद, झोडगा,

धुपेश्वर, दसरखेड, तालसवाडा, रुईखेड, तिघरा, शिवनी आणि रणगाव येथील

नागरिकांना स्थानकात प्रवेश मिळवण्यासाठी तब्बल दोन

किलोमीटर फेरा मारावा लागत असल्याने संतापाची लाट पसरली आहे.

या पार्श्वभूमीवर समतेचे निळे वादळ संस्थापक अध्यक्ष

भाई अशांत वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली प्रवाशांनी निवेदन दिले.

निवेदनात दोन महत्त्वाच्या मागण्यांचा समावेश होता – प्लॅटफॉर्म क्र. २

वरील भिंतीत मोठे गेट तयार करणे आणि त्या प्लॅटफॉर्मवर

स्वतंत्र बुकिंग विंडो उपलब्ध करून देणे. तातडीने मागण्या पूर्ण

न झाल्यास नागरिकांनी लोकशाही मार्गाने मोठे आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला.

सदर निवेदन मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आ. चैनसुख संचेती

यांच्याकडे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना देण्यात आले.

त्याची प्रत केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे तसेच विभागीय रेल्वे व्यवस्थापक,

भुसावळ यांना पाठविण्यात आली. निवेदनादरम्यान एन. के. हिवराळे,

सतीश नाईक, किशोर रोडे, निखिल चीम, संजय रोडे, दीपक मेश्राम,

समाधान सुरवाडे, शिवाजीराव भोसले, रोहीत माहूरे, पंकज पालवे,

दीपक मोरे, मिलिंद हिवराडे, सिद्धार्थ भालशंकर, रोहन भालशंकर,

सचिन तायडे आणि इतर महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आ. चैनसुख संचेती यांनी मार्ग काढण्याचे आश्वासन दिल्यामुळे तात्पुरता दिलासा मिळाला,

मात्र तातडीने तोडगा न निघाल्यास गंभीर आंदोलन व रेल रोको करण्याची चेतावणी प्रवाशांनी दिली आहे.

Read also : https://ajinkyabharat.com/manoj-jarangeche-azhad-maidanavar-bemudat-nutrition/