मलेरियाचा धोका कायम! महाराष्ट्रात पुन्हा वाढले रुग्ण; लक्षणं, कारणं आणि खबरदारी जाणून घ्या

मलेरियाचा धोका कायम! महाराष्ट्रात पुन्हा वाढले रुग्ण; लक्षणं, कारणं आणि खबरदारी जाणून घ्या

आजच्या प्रगत वैद्यकीय युगातही काही आजार अजूनही जीवघेणे ठरत आहेत.

मलेरिया हा असाच एक संसर्गजन्य रोग असून महाराष्ट्रात पुन्हा एकदा या आजाराने डोके वर काढले आहे.

डासांमार्फत पसरणाऱ्या या आजाराची लक्षणं सुरुवातीला सामान्य तापासारखी वाटू शकतात,

Related News

पण योग्य वेळी उपचार न मिळाल्यास त्याचे परिणाम गंभीर ठरू शकतात.

मलेरिया कशामुळे होतो?

मलेरिया हा ॲनाफिलिस डासांच्या मादीमुळे होतो. या डासांच्या जवळपास 400 प्रजाती असून,

त्यातील सुमारे 30 प्रजाती मलेरिया पसरवण्यास कारणीभूत ठरतात. हे डास प्रामुख्याने सूर्यास्त आणि सूर्योदयाच्या सुमारास चावतात.

कोण असतो अधिक धोकेदायक स्थितीत?

डॉ. शाल्मली इनामदार (कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल) यांच्या मते, मलेरियाचा धोका लहान मुले,

गर्भवती महिला, वृद्ध, एचआयव्हीबाधित किंवा केमोथेरेपीवर असलेले रुग्ण यांना अधिक असतो.

तसेच ग्रामीण भागातील किंवा साचलेल्या पाण्याजवळ राहणाऱ्या नागरिकांनाही संसर्गाचा धोका अधिक असतो.

मलेरियाची लक्षणं ओळखा:

  • अचानक ताप चढणं

  • थंडी वाजून येणं

  • डोकेदुखी, थकवा, अंगदुखी

  • मळमळ, उलटी आणि भूक न लागणं

  • दर 48-72 तासांनी तापाची पुनरावृत्ती

गंभीर स्थितीत रुग्णांना गोंधळ, झटके, श्वास घेण्यास त्रास व अवयव निकामी होण्याची शक्यता असते.

उपचार आणि काळजी:

रक्ताची तपासणी करून निदान झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने तातडीने मलेरियाविरोधी औषधोपचार सुरू करावेत.

कोणती औषधे द्यायची हे रुग्णाच्या वय, आरोग्य आणि संसर्गाच्या तीव्रतेवर अवलंबून असतं.

महाराष्ट्रात मलेरियाचे हॉटस्पॉट जिल्हे:

टीव्ही9 मराठीच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात मलेरियाचे सर्वाधिक रुग्ण खालील जिल्ह्यांत आढळले आहेत:

  1. मुंबई

  2. ठाणे

  3. गडचिरोली

  4. पालघर

  5. नाशिक

काय खबरदारी घ्याल?

  • घरात आणि आजूबाजूला साचलेलं पाणी टाळा

  • झोपताना मच्छरदाणी वापरा

  • अंग झाकणारे कपडे परिधान करा

  • डासप्रतिबंधक क्रीम किंवा स्प्रे वापरा

मलेरिया टाळण्यासाठी सजगता आणि स्वच्छता हाच सर्वोत्तम उपाय आहे. पावसाळ्याच्या काळात विशेष काळजी

घ्या आणि कोणतीही लक्षणं जाणवल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Read Also : https://ajinkyabharat.com/the-creature-of-the-activan-gun-gun-and-trying/

Related News