“मला नोबेल द्या! नाहीतर टॅरिफ लावेल”
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत.
शांततेसाठी दिला जाणारा नोबेल पुरस्कार मिळावा यासाठी ट्रम्प यांनी थेट नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांनाच धमकी दिल्याचा दावा करण्यात आला आहे.
नोबेल न दिल्यास टॅरिफ
नॉर्वेतील प्रमुख वृत्तपत्र डेगेन्स नेरिंगस्लिवच्या माहितीनुसार, ट्रम्प यांनी नॉर्वेचे अर्थमंत्री जेन्स स्टोल्टेनबर्ग यांना फोनवर धमकी दिली.
त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले –“मी जगात सहा युद्धे थांबवली आहेत. नोबेल शांतता पुरस्काराचा खरा हकदार मीच आहे. जर मला पुरस्कार दिला नाही, तर नॉर्वेवर टॅरिफ लादेन.”
ट्रम्प यांनी नॉर्वेतून अमेरिकेत येणाऱ्या मालावर १५ टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा आधीच केली आहे.
अनेक देशांची शिफारस
इस्त्रायल, पाकिस्तान आणि कंबोडियासह काही देशांनी ट्रम्प यांच्या नावाची नोबेलसाठी शिफारस केली आहे.
मात्र भारताने शिफारस न केल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त करत टॅरिफ लादल्याचा आरोप होत आहे.
नोबेलचा आग्रह
“माझ्यापूर्वी अमेरिकेच्या चार राष्ट्राध्यक्षांना नोबेल मिळाला, मग मला का नाही?” असा सवाल ट्रम्प यांनी केला आहे.
नोबेल समिती स्वीडनमध्ये कार्यरत आहे, पण शिफारसीसाठी ट्रम्प वारंवार नॉर्वेच्या मंत्र्यांवर दबाव टाकत असल्याचा आरोप आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/hiway-statecha-ahe-national/