पुणे शहरातील कारखान्यात मोठा अपघात, चार कामगारांचा मृत्यू

पुणे शहरातील येवलेवाडी येथील कारखान्यात मोठा अपघात

झाला. काचेच्या कारखान्यात हा अपघात झाला. गाडीतून काचा

उतरवताना काचेच्या पेटीखाली काही कामगार दाबले गेले. या

Related News

अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे. एकावर रुग्णालयात उपचार

सुरु आहे. येवलेवाडी येथे दुपारी एक ते दीडच्या दरम्यान ही घटना

घडली. या ठिकाणी असलेल्या एका काचेच्या कारखान्यात माल

उतरताना काचा फुटल्या. त्यात काचेच्या पेटीखाली काही कामगार

अडकल्याची माहिती कोंढवा भागातील अग्निशामक दलाला

मिळाली होती. त्यानंतर तातडीने अग्निशामक दलाचे जवान

घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी काचेच्या पेटीखाली दाबले

गेलेल्या सर्व कामगारांना बाहेर काढले. त्यातील चार जण अस्वस्थ

होते. त्यांना ससून रुग्णालयात दाखल केले होते. परंतु दाबले

गेलेल्या सहा कामगारांपैकी चार जणांचा दुर्दैवी मृत्यू आहे. एका

कामगाराची प्रकृती गंभीर आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/file-a-case-against-the-chief-minister-immediately-and-file-a-petition-in-the-mumbai-high-court/

Related News