माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड नजरकैदेत?

संजय राऊतांचं अमित शाहांना पत्र; राजकीय वर्तुळात खळबळ

संजय राऊतांचं अमित शाहांना पत्र; राजकीय वर्तुळात खळबळ

नवी दिल्ली – देशाचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर ते अचानक सार्वजनिक जीवनातून गायब झाल्याची चर्चा रंगू लागली आहे.

त्यांच्या ठिकाणाबाबत आणि प्रकृतीबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नसल्याने विरोधकांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

शिवसेना (ठाकरे गट) चे खासदार संजय राऊत यांनी याच मुद्द्यावर थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र

लिहून धनखड यांच्या सुरक्षितते आणि आरोग्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे.

या पत्रातून त्यांनी तातडीने माहिती जाहीर करण्याची मागणी केली आहे.

संजय राऊत यांनी पत्रात म्हटले आहे की, “मी हे पत्र अत्यंत गंभीर आणि चिंताजनक परिस्थितीत लिहित आहे.

माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या सुरक्षिततेबाबत आणि आरोग्याबाबत गेल्या काही दिवसांपासून अफवा पसरत आहेत, ज्यामुळे आम्ही सर्वजण चिंतीत आहोत.

२१ जुलै रोजी राज्यसभेचं कामकाज सभापतींच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे थांबवण्यात आलं. त्यानंतरच्या घडामोडी मात्र अधिक धक्कादायक आहेत.”

यापूर्वीही राऊत यांनी धनखड कुठे आहेत, त्यांचं काय झालं, असा सवाल उपस्थित केला होता.

त्यांनी चीन आणि रशियामधील विरोधकांना ‘गायब’ करण्याची परंपरा आठवून मोदी सरकारवर टीका केली होती.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनीही यावर प्रतिक्रिया देताना ‘लापता लेडीज’ चित्रपटाची आठवण करून दिली.

तर राजस्थानमध्ये धनखड यांच्या समर्थनार्थ बोलणाऱ्या भाजप प्रवक्त्याला पक्षाने सहा वर्षांसाठी निलंबित केल्यानं, विरोधकांनी या प्रकरणाला आणखी गती दिली आहे.

या पार्श्वभूमीवर राऊतांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर थेट आरोप करत अमित शाहांना पत्राद्वारे धनखड यांच्याबाबत

संपूर्ण माहिती जाहीर करण्याची मागणी केली असून, यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.

Read also :https://ajinkyabharat.com/gavandagavat-tarunachi-suicides-polisancha-daruvikrayankade/