माजी सैनिकावर हल्ला प्रकरण, नागरिकांचा पोलीस स्टेशनवर मोर्चा

खदान

खदान परिसरातील नागरिकांचा पोलीस स्टेशनवर मोर्चा

अकोल्यात भाजपच्या माजी नगरसेविका आणि

नगरसेविकेचा पती तसेच इतर सहा जणांनी एका माजी सैनिकावर

Related News

जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात माजी सैनिक हा

गंभीर स्वरूपात जखमी झाला असून त्यांच्यावर अकोल्यातल्या

खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. बुद्धपाल सदांशिव असे

या जखमी झालेल्या माजी सैनिकाचे नाव आहे. या प्रकरणात

अकोला पोलिसांनी भाजपच्या माजी नगरसेविका ‘मंगला सोनोने’

आणि त्यांचे पती गजानन सोनोने’ यांच्यासह 8 लोकांविरुद्ध

गुन्हा दाखल केला होता त्यातील मुख्य आरोपी सह तिन आरोपींना

अटक करण्यात आली होती उर्वरित आरोपींना अटक करण्या करिता

मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास खदान परिसरातील शेकडो नागरिक

खदान पोलीस स्टेशनवर मोर्चा घेऊन गेले होते.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी सह खदान पोलिस स्टेशनचे

पोलीस निरीक्षक नंदकिशोर शेळके यांनी खदान परिसरातील नागरिकांची

समजूत काढून उर्वरित आरोपींना तात्काळ अटक करण्यात येईल असे आश्वासन दिले.

Read also: https://ajinkyabharat.com/kolkatas-ghantne-padsaad-akolyat/

Related News