मे महिना म्हटलं की अकोल्यात तापमानाचा पारा 46-47 अंश सेल्सिअसपर्यंत जातो.
पण यंदा मात्र चित्र पूर्णपणे वेगळं आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी
पावसाने थैमान घातल्यामुळे उन्हाळ्यातच पावसाळ्याचा अनुभव अकोल्यकर घेत आहेत.
Related News
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
अकोल्यात पुन्हा रिमझिम पाऊस; ९० टक्के पेरणी पूर्ण, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित
अकोट बस स्टॅन्ड परिसरात घडलेले चोरीचे ०४ गुन्हे महिला आरोपी कडुन उघडकीस
अकोल्यात २८०० जन्म प्रमाणपत्रे रद्द; “बांगलादेशी” ठरवलेल्यांवर वाद, अबू आझमी यांची सरकारकडे चौकशीची मागणी
भारताचा लॉर्ड्सवर दारूण पराभव; जयस्वाल-नायरच्या फ्लॉप कामगिरीवर चाहत्यांचा संताप
आज 26 मे रोजी सकाळपासूनच अकोला शहरासह आसपासची गावं,
शेती क्षेत्र धुक्याच्या दाट चादरीखाली दडून गेली होती.
हे दृश्य मे महिन्यासाठी अत्यंत दुर्मीळ मानलं जातं.
उन्हाच्या झळांत पावसाचं थंडावलेलं हवामान आणि त्यात धुक्याची जोड
मिळाल्याने नागरिक आश्चर्यचकित झाले आहेत.
अनेकांनी या बदललेल्या हवामानाचा आनंद घेतला असला तरी शेतीच्या दृष्टीने हे वातावरण
नेमकं किती फायदेशीर ठरेल, यावर अजून स्पष्टता नाही.
हवामान विभागाने असा अंदाज व्यक्त केला आहे की पुढील दोन ते तीन
दिवस असेच हवामान राहणार आहे.
त्यामुळे अकोल्यात मे महिना यंदा उष्णतेपेक्षा गारव्यातच सरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/kovid-19-punha-vadhtoy-date-2025-middle-pahilyandach-1000-hoon-more-accessory