Delhi Govt State Budget 2025 Highlights : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी मंगळवारी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला.
दिल्ली सरकारने प्रथमच सभागृहात एक लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला
आणि अर्थसंकल्पात महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी ५१०० कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली,
Related News
ज्यामध्ये महिला समृद्धी योजनेअंतर्गत दरमहा २५०० रुपयांचीही घोषणा केली गेली.
हायलाइट्स:
- CM रेखा गुप्ता यांनी दिल्लीसाठी एक लाख कोटींचा अर्थसंकल्प सादर केला
- महिलांसाठी ‘महिला समृद्धी योजने’वर ५१०० कोटी रुपये खर्च केले जातील
- महिलांच्या सुरक्षेसाठी ५० हजार अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येतील
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी फेब्रुवारीमध्ये सरकार
स्थापनेनंतर आपल्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प (बजेट) सादर केला आहे.
मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिल्ली विधानसभेत सांगितले की, ‘आज दिल्लीसाठी एक ऐतिहासिक दिवस आहे.’
रेखा गुप्ता यांनी २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी दिल्ली सरकारचा एक
लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला, जो मागील आर्थिक वर्षाच्या बजेटपेक्षा ३१.५ टक्के जास्त आहे.
महिला समृद्धी योजनेसाठी ५१०० कोटींची तरतूद
आपल्या अर्थसंकल्प भाषणेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या.
यापैकी दिल्ली सरकारने राज्यातील लोकांसाठी दहा लाखांचा आरोग्य विमा जाहीर केला तर महिलांचे लक्ष लागून असलेल्या
‘महिला समृद्धी योजने’साठी अर्थसंकल्पात ५१०० कोटी रुपयांची तरतूद जाहीर केली.
याअंतर्गत, योजनेच्या लाभार्थी दिल्लीतील प्रत्येक महिलेला दरमहा रु. २५०० ची आर्थिक मदत दिली जाईल,
अशी घोषणा राज्याच्या मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांनी केली.महिलांना आर्थिक स्वातंत्र्य आणि सक्षमीकरण प्रदान
करण्याच्या उद्देशाने ही योजना तयार करण्यात आली आहे पण, यासाठी काही निकषांचे पालन करावे लागेल.
‘महिला समृद्धी योजने’चा लाभ कोणाला?
दिल्लीतील महिला समृद्धी योजनेअंतर्गत केवळ २१ ते ६० वर्षे वयोगटातील महिलांनाच आर्थिक लाभ मिळू शकेल.
याशिवाय, महिलेला पाच वर्षे दिल्लीची कायम रहिवासी असणेही अनिवार्य आहे. ही योजना प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक
आणि दारिद्र्यरेषेखालील महिलांसाठी असून यामध्ये बीपीएल कार्डधारकांना प्राधान्य दिले जाईल.
तसेच सरकारी नोकरी किंवा कुटुंबातील सदस्य आयकर फाईल करत असेल तर अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
महिलांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त CCTV कॅमेरे
मुख्यमंत्री रेखा गुप्ता विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना म्हणाल्या की, दिल्लीच्या रस्ते वाहतूक आणि पायाभूत सुविधांच्या विकास
आणि NCR मध्ये कनेक्टिव्हिटीसाठी १००० कोटी रुपये खर्च केले जातील. तसेच, महिलांच्या सुरक्षिततेचा विचार
करून ५० हजार अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचीही घोषणा केली.
याशिवाय, शंभर ठिकाणी अटल कॅन्टीन उघडली जातील, ज्यासाठी १०० कोटी रुपयांचे बजेट वाटप केले जाईल.
दिल्ली विधानसभा निवडणुकीआधी भारतीय जनता पक्षाने (भाजप) राज्यातील महिलांना मध्य प्रदेश
आणि महाराष्ट्र लोकप्रिय ठरलेल्या लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर, महिला समृद्धी योजनेंतर्गत दरमहा
२५०० रुपये आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले होते.
याअंतर्गत नोंदणी देखील सुरू झाली असून नुकतीच महिलांसाठी अर्थसंकल्पात तरतूद केली गेली आहे.