“महायुतीत सर्व काही आलबेल?

पोस्टरवरून शिंदे गायब

बातमी:मुंबईतील मराठा आंदोलनावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एकटे पडल्याचे चित्र चर्चेत आले होते. मात्र, आता राज्यभरातील वृत्तपत्रांमध्ये आणि मुंबईत ठिकठिकाणी देवाभाऊंनी आभाळ व्यापलेले जाहिराती दिसल्या. मात्र या जाहिरातींमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची उपस्थिती दिसून येत नाही. त्यामुळे सत्ताधारी महायुतीत श्रेयवादाची लढाई सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

महायुतीत तणाव असल्याचे समजताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी स्पष्ट केले, “घटक पक्षांमध्ये कामाचे श्रेय लाटण्याची किंवा नेत्यांमध्ये स्पर्धेची कोणतीही लढाई नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आम्ही एका टीमप्रमाणे काम करत आहोत. मराठा आरक्षण असो वा इतर मागासवर्गाचे हक्क, महायुती सरकारने केलेली कामं आम्ही एकत्र पूर्ण केली आहेत.”

शनिवारच्या जाहिरातीत मुख्यमंत्री फडणवीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला फुलं वाहताना आणि गणपती पूजा करताना दाखवले गेले आहेत. मात्र या जाहिरातीवर कोणता पक्ष किंवा व्यक्ती खर्च करत आहे, हे अद्याप स्पष्ट नाही. उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांनी या जाहिरातीवर सडकून टीका केली आहे.

शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, “आम्ही श्रेयवादाच्या कोणत्याही लढाईत नाही. राज्याचा विकास आणि गरीब, गरजूंची मदत करणे हा आमचा उद्देश आहे. देवेंद्रजी आणि मी एका टीमच्या रुपाने काम करत आहोत, आमचा अजेंडा तोच राहील.”

या जाहिरातीमुळे महायुतीतील राजकीय वातावरण पुन्हा चर्चेत आले असून, पुढील दिवसांमध्ये या चर्चेवर राजकीय विश्लेषकांचे लक्ष राहणार आहे.

READ ALSO :https://ajinkyabharat.com/ajitdada-mitkari-navachaya-schwanala-aara/