महावितरणच्या विद्युत सुरक्षा अभियानाला जागतिक सन्मान

‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स’ संस्थेने महावितरणचा सन्मान

अकोला  – महावितरणच्या शून्य विद्युत अपघात जनजागृती अभियानातील

विक्रमी लोकसहभागाला जागतिक स्तरावर दखल मिळाली असून इंग्लंडमधील

‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स’ संस्थेने महावितरणचा सन्मान केला.

या उपक्रमाचे मार्गदर्शन करणारे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक  लोकेश चंद्र

आणि अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार

यांनाही आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्राने गौरविण्यात आले.

मुंबई येथे आयोजित समारंभात महावितरणच्या वतीने  राजेंद्र पवार

आणि विशेष कार्य अधिकारी मंगेश कोहाट यांनी प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह स्वीकारले.

कार्यक्रमास प्रख्यात मानसशास्त्रज्ञ  दिवाकर सुकुल (लंडन), शास्त्रज्ञ डॉ. मधू कृष्णन (अमेरिका),

ज्येष्ठ संपादक व माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुरस्कार समितीने महावितरणच्या विद्युत सुरक्षेच्या लोकाभिमुख अभियानाचे कौतुक केले.

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक  लोकेश चंद्र यांनी कर्मचाऱ्यांचे कौतुक करत सांगितले,

“शून्य विद्युत अपघात हे महावितरणच्या दैनंदिन कामाचा महत्त्वाचा भाग आहे.

विविध उपक्रम व लोकसंपर्क कार्यक्रमांद्वारे नागरिकांना विद्युत सुरक्षेबाबत सतत जागरूक केले जाते.”

महावितरणने यंदा २० व्या वर्धापन दिनानिमित्त दि. १ ते ६ जून दरम्यान राज्यभरात

विद्युत सुरक्षेच्या जनजागृतीसाठी उपक्रमांचे आयोजन केले होते.

यामध्ये तब्बल २,११,००० नागरिक, शालेय विद्यार्थी, अभियंते,

अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला,

तर १ कोटी ९२ लाख ७९ हजार ग्राहकांना मोबाईलवर

आणि ३५ लाख ७३ हजारांवर ग्राहकांना ईमेलद्वारे विद्युत सुरक्षेबाबत माहिती पुरवली गेली.

महावितरणला आधीच एशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड

यामध्ये या विक्रमासाठी गौरव मिळाले होते.

आता जागतिक स्तरावर वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स ने या

अभियानातील विक्रमाची अधिकृत नोंद घेतली आहे.

या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये विद्युत सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण झाली असून,

महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेचा जागतिक स्तरावर गौरव झाला आहे.

read also : https://ajinkyabharat.com/akola-pavasamue-koslele-vis-khamb-mahavitranne-tatka-nirman-banana/