महावितरणच्या निष्काळजीपणाचा बळी; पावसात भीषण अपघात

विद्युत खांबाने घेतला जीव, दुसरा तरुण गंभीर जखमी

अकोल्यात  विद्युत खांबाचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी

अकोला : शहरात शुक्रवारी सायंकाळी मुसळधार पावसात

जुन्या शहरातील महापालिका हद्दीत एक हृदयद्रावक अपघात घडला.

कामावरून परतणाऱ्या दोन तरुणांना रस्त्यावरील

जिवंत विद्युत खांबाचा शॉक बसला.

या भीषण अपघातात सय्यद राजा (वय २५) याचा जागीच मृत्यू झाला,

तर त्याचा साथीदार अस्लम गंभीर जखमी झाला आहे.

त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार,

महावितरणच्या निष्काळजीपणामुळेच ही दुर्घटना घडली.

पावसामुळे पाण्याने भरलेल्या रस्त्यांमध्ये विद्युत खांब धोकादायक ठरत असून,

प्रशासनाच्या हलगर्जीपणाबद्दल परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे.

घटनेची माहिती मिळताच आमदार साजिद खान पठाण

घटनास्थळी धावून आले व परिस्थितीचा आढावा घेतला.

त्यांनी पीडित कुटुंबीयांना दिलासा देत,

“न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील,” असे आश्वासन दिले.

read also :https://ajinkyabharat.com/1-supportember-passun-mumbai-howrah-durunto-expressla-akolid-tamb/