– नाना पटोलेंसोबत चर्चा करण्यास ठाकरे गटाचा नकार
जागा वाटपात विदर्भातील जागांबाबत नाना पटोले हे अडवणूक करत असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. त्यामुळे आता जागा वाटपाचा तिढा आणखीनच वाढला असल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात उद्धव ठाकरे गटाने काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे नाना पटोले यांची तक्रार देखील केली आहे. त्यातच नाना पटोले या संदर्भात चर्चा करण्यासाठी शरद पवार यांच्याकडे पोहोचले आहेत. त्यामुळे आता महाविकास आघाडीत जागा वाटपाचा वाद कसा मिटतो, ते पहावे लागणार आहे.
———————–
जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आज सकाळीच उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दिली होती. यावेळी प्रतिक्रिया देतानाच त्यांनी आज जागा वाटपाचा निर्णय अंतिम होणे आवश्यक असल्याचे म्हटले होते. इतकेच नाही तर काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांना अधिकार नसतील तर राहुल गांधी यांच्याशी चर्चा करावी लागणार असल्याचे ते म्हणाले होते. त्यानंतर झालेल्या जागा वाटपाच्या बैठकीत संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यात वाद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार आता नाना पटोले यांच्याशी चर्चा करणार नसल्याचे उद्धव ठाकरे गटाने म्हटले आहे.
——————————