अकोला जिल्ह्यातील गोपालखेड येथील पूर्णा नदीच्या तळाशी असलेल्या स्वयंभू
महादेवाच्या पिंडीच्या दर्शनासाठी महाशिवरात्रीनिमित्त हजारो भाविकांची गर्दी उसळते.
हे शिवलिंग भूगर्भात जवळपास १०० फूट खोल असून, महाशिवरात्रीपूर्वी
Related News
अकोल्यात उन्हाचा तडाखा! तापमान ४४.२ अंशांवर, राज्यातील सर्वाधिक
माझोड – बाभुळगाव रस्त्याच्या दुरुस्तीसाठी खासदार अनुप धोत्रे यांचा पुढाकार;
भाऊसाहेब पोटे विद्यालयात NMMS पात्र गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा
‘सहकारातून समृद्धी’ योजनेतून सहकार चळवळीला नवे बळ – नानासाहेब हिंगणकर
सावता परिषदेच्या पातूर तालुका अध्यक्षपदी अजय ढोणे यांची निवड
आर्थिक विवंचनेत अडकलेल्या युवक शेतकऱ्याची आत्महत्या
श्रीराम नवमी निमित्त अकोला शहरात धार्मिक शोभायात्रेची जय्यत तयारी
लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिरमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
डोळ्यांखालील डार्क सर्कल्सने आहात हैराण? जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय
करुणा व धनंजय मुंडे प्रकरणात नवीन वळण;
||देह वेचावा कारणीं|
अकोट येथे माळी महासंघाच्या नामफलकाचे उद्घाटन आणि पदाधिकाऱ्यांचा सन्मान
ग्रामस्थ मातीचे उत्खनन करून भाविकांसाठी दर्शन खुले करतात.
शतकाहून जुने मंदिर आणि भक्तांचा उत्साह
पानेट गावाजवळील पूर्णा नदीच्या काठावर असलेल्या
‘श्री मारुती व ब्रह्मचारी महाराज संस्थान’च्या वतीने दरवर्षी हे शिवकार्य पार पडते.
गोपालखेड गावातील आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ पंधरा दिवस मेहनत करून ही पिंड भाविकांसाठी
उपलब्ध करून देतात. विशेष म्हणजे, पावसाळ्यापर्यंतच या शिवलिंगाचे दर्शन होऊ शकते.
मंदिर परिसरातील ब्रह्मचारी महाराज यांच्या समाधीस्थळीही स्वच्छता मोहीम राबवली जाते.
महाशिवरात्रीच्या सात दिवस आधी येथे सप्ताह आयोजित केला जातो, ज्यात मोठ्या संख्येने भक्तगण सहभागी होतात.
१२ पिंडी आणि ऐतिहासिक दंतकथा
महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाचा समारोप केला जातो.
येथील मंदिर १२५ वर्षांपेक्षा जुने असून, ब्रह्मचारी महाराजांना येथे स्वयंभू महादेवाच्या पिंडीचा
साक्षात्कार झाल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे, येथे महादेवाच्या १२ पिंडी असून, त्या विविध कपारींमध्ये स्थित आहेत.
गावकरी सांगतात की ब्रह्मचारी महाराज, गजानन महाराज, आणि नरसिंह महाराज हे समकालीन संत येथे भेटत असत.
या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारशामुळे महाशिवरात्रीला या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात.
Read more news here :https://ajinkyabharat.com/gharat-saha-futi-python-pahun-angat-tharkap/