महाराष्ट्राचे अतिरिक्त राज्यपालपदावर शपथविधी सोहळा

शपथविधीपूर्वक कार्यभार ग्रहण

मुंबई: आचार्य देवव्रत यांचा महाराष्ट्राच्या अतिरिक्त राज्यपालपदी शपथविधी सोहळा भव्य पद्धतीने पार पडला. शिक्षण, समाजसेवा आणि वैदिक अभ्यास या क्षेत्रात दीर्घकाळ कार्यरत असलेल्या आचार्य देवव्रत यांना या महत्त्वपूर्ण पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

 आचार्य देवव्रत यांनी हरियाणातील गुरुकुल कुरुक्षेत्र येथे प्राचार्य म्हणून कार्य केले असून २०१५ मध्ये हिमाचल प्रदेश आणि २०१६ पासून गुजरातचे राज्यपाल म्हणून जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. आता त्यांना महाराष्ट्राचा अतिरिक्त राज्यपालपदाचा कार्यभार दिला गेला आहे.

 शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आचार्य देवव्रत यांचे शिक्षण व समाजसेवेतील योगदान सर्वांसाठी प्रशंसनीय ठरले आहे.

read also :http://ajinkyabharat.com/blood-donation-shibirat-202-janancha-vikrami-contribution/