यवतमाळ – वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना त्यांचा विकासाचा केंद्रबिंदू शेतकरी हाता. शेतकर्यांना समोर ठेऊन ते धोरण आखायचे.
त्यांना सुखी संपन्न करण्यासाठी त्यांनी वेगवेगळी धोरणे आणली. शेती, सिंचन, वीज, उद्योग असे राज्याच्या विकासासाठी त्यांनी सर्वांगीण काम केले.
राज्याच्या जडणघडणीत त्यांचा अतिशय मोलाचा वाटा आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालय, पुसद येथे वसंतराव
नाईक स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार वितरणप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पालकमंत्री बोलत होते. कार्यक्रमास पुरस्कार वितरण सोहळा
समितीचे स्वागताध्यक्ष तथा राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आ. बाबूसिंग महाराज, आ. किसन वानखेडे, माजी आमदार डॉ. संदीप धुर्वे, विजय खडसे, नीलय नाईक, ख्वाजा बेग, महाराष्ट्र
राज्य हाउसिंग फायनान्स कार्पोरेशनचे अध्यक्ष वसंत घुईखेडकर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष ययाती नाईक, डॉ. टी.सी.राठोड, दीपक आसेगावकर, अॅड. आशीष देशमुख, महंत
जितेंद्र महाराज, धनंजय सोनी आदी उपस्थित होते. शेतकर्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी नाईकांनी चार कृषी विद्यापीठे निर्माण केली. दुष्काळाच्या काळात अन्नधान्याच्या
स्वयंपूर्णतेसाठी मोठे काम केले. शेतकर्यांना अधिक उत्पन्न देणारे बियाण्यांचे संकरित वाण त्यांनी आणले. दुष्काळात मजुरांच्या हाताला काम देण्यासाठी रोजगार हमी सारखी योजना
आणली. बियाणे महामंडळाची स्थापना त्यांनी केली. त्यांनी आणलेले पंचायत राज व्यवस्थेचे धोरण तर आज संपूर्ण भारतभर राबविण्यात येत असल्याचे पालकमंत्री पुढे बोलताना
म्हणाले. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा विस्तार नाईकांनी केला. प्रत्येक शेतकर्यास सिंचनासाठी वीज उपलब्ध झाली पाहिजे, अशी त्यांची भूमिका असल्याचे औष्णिक वीज
प्रकल्पांना त्यांनी चालना दिली. कापूस खरेदीत शेतकर्यांची होणारी लूट थांबविण्यासाठी कापूस एकाधिकार योजना राबविली. त्यांनी अनेक सिंचन प्रकल्प सुरू केले. शेतकर्यांच्या
मालाला योग्य भाव मिळण्यासाठी बाजार समित्या निर्माण झाल्या पाहिजे, अशी भूमिका त्यांनी घेतली. आजचा दिवस त्यांचा स्मृतीदिन तर आहेच, त्यांच्या विचारांना आचरणात
आणण्याचा दिवस देखील असल्याचे पालकमंत्री म्हणाले. नाईक साहेबांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या नावे असलेला पुरस्कार देऊन प्रयोगशील शेतकरी व कृषी शेतकर्यांचा आपण
गौरव केला. हा केवळ सन्मान नाही तर भविष्यातील पिढीसाठी प्रेरणेचा ठेवा आहे. हे प्रयोगशील शेतकरी नाईक साहेबांच्या कार्याचा वारसा पुढे नेणार आहे. गहूली सारख्या लहानशा
गावातून सुरुवात करून साहेबांनी तब्बल अकरा वर्ष राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली. त्यांचे काम केवळ राज्यातच नाही तर संपूर्ण देशात होते, असे पुढे बोलताना
पालकमंत्र्यांनी सांगितले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना राज्यमंत्री इंद्रनील नाईक म्हणाले, वसंतराव नाईक यांना पाऊस फार आवडायचा. त्यामुळेच त्यांनी मुख्यमंत्री असताना
मुख्यमंत्री निवासस्थानाचे नाव ’वर्षा’ असे ठेवले. त्यांनी राज्यात हरितक्रांती आणली, धरणे बांधले, रोजगार हमी योजना सुरू केली, पंचायतराज व्यवस्था निर्माण केली. सुधाकर नाईक
यांच्या संकल्पनेतून वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान सुरू झाले. या प्रतिष्ठानच्यावतीने आतापर्यंत 585 शेतकर्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला असल्याचे इंद्रनील नाईक
म्हणाले. यावेळी आ. बाबूसिंग महाराज व माजी आमदार नीलय नाईक यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
Read also : https://ajinkyabharat.com/65-year-old-iver-donvela-atrocity-polisant-dhaun-mulala-stuck/