महाराष्ट्र केसरी २०२६ चा अंतिम फेरीचा थरार आज पूर्ण महाराष्ट्राच्या कुस्तीप्रेमींसाठी खुलणार आहे. पुण्यातील वाघोली येथे आयोजित ६८ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे अंतिम फेरीत माती व गादी विभागातील धडधाकेबाज मल्ल आपले जलवे दाखवणार आहेत. यंदा माती विभागामध्ये सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड, तर गादी विभागामध्ये हर्षवर्धन सदगीर आणि जय पाटील यांच्यात भयंकर लढती होणार आहेत.
माती विभागामध्ये उपांत्य फेरीत हिंगोलीचा चपळ मल्ल सिकंदर शेखने अहिल्यानगरचा सुदर्शन कोतकर ४-३ ने हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला. त्याचप्रमाणे सोलापूरचा बलदंड मल्ल महेंद्र गायकवाडने रविराज चव्हाणवर १०-० असा एकतर्फी विजय मिळवला आणि अंतिम फेरीत सिकंदरसोबत आमनेसामने येणार आहे. दोघेही मल्ल तुफानी असून, एक चपळ तर दुसरा बलदंड, त्यामुळे माती विभागात कोण बाजी मारेल हे पाहणे अत्यंत रोचक ठरणार आहे. महाराष्ट्र केसरी २०२३ मध्येही या दोघांमध्ये अंतिम फेरीत सामना झाला होता; तेव्हा महेंद्रला विजयी घोषित करण्यात आले, पण पंचांचा निर्णय वादग्रस्त ठरला होता.
गादी विभागातही प्रतिस्पर्धा तितकीच रोमांचक आहे. हर्षवर्धन सदगीर हा अनुभवी मल्ल असून, २०२० च्या महाराष्ट्र केसरी फायनलमध्ये त्याने वेताळ शेळकेवर विजय मिळवला होता. तर सोलापूरचा जय पाटील आपल्या धडाडीच्या खेळामुळे पहिल्या फेरीपासूनच सर्वांना प्रभावित करत अंतिम फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत जयने पुण्याचा महाराष्ट्र केसरी मानकरी पृथ्वीराज मोहोळ फक्त ३६ सेकंदात चितपट करून अंतिम फेरी गाठली. त्यामुळे हर्षवर्धन आणि जय पाटील यांच्यातील सामना अनुभव आणि ताकद या दोन्ही घटकांनी भरलेला असणार आहे.
Related News
'खाशाबा' चित्रपटाचा बहुप्रतीक्षित टीझर प्रदर्शित झाला आहे. खाशाबा जाधव यांच्या संघर्षमय आयुष्याची झलक, नागराज मंजुळे यांची भूमिका, कलाकारांची फौज आणि 1 जानेवारी 2027 च्या रिलीजबद्द...
Continue reading
2027 मध्ये 100 कोटींचा टप्पा पार? नागराज मंजुळेंच्या ‘खाशाबा’चा दमदार टीझर रिलीज; थरार, संघर्ष आणि प्रेरणेची भन्नाट कथा
मराठी चित्रपटसृष्टीत वेगळा ठसा उमटवणारे दिग्दर्शक नागराज मं...
Continue reading
Sikandar Shaikh Thar Accident : 10 सेकंदांत होत्याचं नव्हतं! महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख थोडक्यात बचावलासांगोला-मिरज मार्गावर महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांच्या थार गाडीचा भीष...
Continue reading
कोल्हापूरचा अभिमान: अक्षय ढेरेचा आंतरराष्ट्रीय सुवर्ण झेंडा
कधी मातीशी नातं जोडलेला शेतकरी कुटुंबातील मुलगा आंतरराष्ट्रीय क्रीडा मंचावर देशाचा झेंडा फडकावतो, तेव्ह...
Continue reading
महाराष्ट्र केसरी 2026 चा निकाल गाजला आणि नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने पठ्ठ्या नाशिकच्या महेंद्र गायकवाडला पराभूत करत डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा गौरव मिळवला. या फायनलमध्ये दोन्ही ...
Continue reading
२२ मार्च २०२६ रोजी पुण्यातील बालेवाडी स्टेडियमवर ६८ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२६ भरली. या स्पर्धेतील मुख्य आकर्षण होते नाशिकचा हर्षवर्धन सदगीर आणि सोलापूरचा बलाढ्य मल्ल ...
Continue reading
पुणे: महाराष्ट्र केसरी २०२६ स्पर्धेचा थरार आता चरमसीमेवर पोहोचला आहे. राज्यभरातील कुस्तीगिरीतले टॉप मल्ल आपापल्या ताकद, तंत्र आणि जिद्दीने प्रतिस्पर्ध्यांवर मात करत उपांत्यपूर्व फे...
Continue reading
चेन्नईत विद्यार्थिनी मयुरी चौधरीचा दुर्दैवी मृत्यू, राज्यभरात हळहळ
चेन्नई – महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील वरठी येथील रहिवासी, २६ वर्षीय मयुरी चौधरी या तरुणीला चेन्नईत फिरताना ...
Continue reading
महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक: शस्त्र तस्करी आरोप की राजकीय डाव? कुस्तीविश्व हादरले
महाराष्ट्राच्या कुस्तीविश्वाला हादरवणारी धक्कादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र केसरी विज...
Continue reading
तुफान अॅक्शनसह 'रांगडा' चित्रपटाचा ट्रेलर झाला रिलीज. गेल्या काही दिवसांपासून रांगडा चित्रपटाच पोस्टर रिलीज झाल होत.त्यामुळे चित्रपटाची चर्चा चांगलीच रंगली होती.नुकताच ...
Continue reading
या अंतिम फेरीत माती व गादी विभाग दोन्हीमध्ये प्रेक्षणीय लढती पाहायला मिळणार आहेत. महाराष्ट्र केसरी २०२६ चा किताब कोण जिंकणार, सिकंदर, महेंद्र, हर्षवर्धन किंवा जय यापैकी कोण बाजी मारेल, हे काही तासांतच स्पष्ट होईल. या वर्षी जय पाटील आणि महेंद्र गायकवाड यांना पहिल्यांदा महाराष्ट्र केसरी होण्याची संधी आहे, तर हर्षवर्धन आणि सिकंदर यांचे अनुभव आणि ताकद पाहायला मिळेल. कुस्तीप्रेमींमध्ये या फायनलसाठी उत्सुकता चरमशिखरावर आहे.
महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत प्रेक्षकांना सहा मिनिटांच्या थरारक सामन्यात कोण बाजी मारणार, हे पाहणे सर्वांसाठी मनोरंजक ठरणार आहे. या वर्षी माती विभागात सिकंदर व महेंद्र, तर गादी विभागात हर्षवर्धन व जय यांची सामना प्रेक्षकांना मोठा उत्साह देणार आहे.
read also : https://ajinkyabharat.com/ashok-kharat-case-hatachi-botan-tantra-mantra-anamika-and-demand-of-maharashtra-superstition-eradication-committee/