महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाला दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचे नाव देणार

शिंदे सरकार ने मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळा ने

महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाचे नाव बदलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय

घेतला आहे. या विद्यापीठाला आता दिवंगत उद्योगपती रतन टाटा

Related News

यांचे नाव देण्यात येणार आहे. दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांच्या

सन्मानार्थ सरकारने हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र कौशल्य

विकास विद्यापीठ आता रतन टाटा विद्यापीठ म्हणून ओळखले

जाणार आहे. 9 ऑक्टोबर रोजी उद्योगपती रतन टाटा यांचे निधन

झाले आणि संपूर्ण देशाने या मोठ्या हानीवर शोक व्यक्त केला.

रतन टाटा यांनी आपले संपूर्ण आयुष्य देश सुधारण्यासाठी आणि

भारताला एक नवीन ओळख देण्यासाठी समर्पित केले. त्यांच्या

निधनानंतर त्यांच्या स्मरणार्थ महायुती सरकारने हा महत्त्वपूर्ण

निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली

आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे

निर्णय घेण्यात आले. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार

यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

Read also: https://ajinkyabharat.com/air-india-mumbai-new-york-airport-bomb-threat/

Related News