महाराष्ट्र अवार्डवर जलवा, मिसेस कॅटेगरीतील विजेता

अकोल्याच्या अनुजा भोसले प्राइड ऑफ महाराष्ट्र विजेत्या

अकोला येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या अधिपरिचारिका अनुजा भोसले महिला मॉडेल्समधून झळकल्या

अकोला: पुणम प्रोडक्शनच्या बॅनरखाली गोकुलपुरे आयोजित प्राइड ऑफ महाराष्ट्र सिझन ४ कार्यक्रम अमरावती येथे भव्य स्वरुपात पार पडला. या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या विविध भागातील महिला मॉडेल्सने भाग घेतला. कार्यक्रमाचे आयोजन तापडिया सिटी सेंटर मॉल, अमरावती येथे करण्यात आले.

कार्यक्रमाच्या निर्णायक मंडळात गगनदीप सिंह (मिस्टर इंडिया), डॉ. एलिझा (मिस ट्रांस इंडिया वर्ल्ड अँड यूनिव्हर्स), डॉ. गणेश आणि मिस वैशाली भगत यांचा समावेश होता.

या कार्यक्रमात अकोला येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अधिपरिचारिका म्हणून कार्यरत सौ. अनुजा अक्षय भोसले यांनी मिसेस कॅटेगरीमध्ये बाजी मारली. त्या जुळ्या मुलांच्या आई असून त्यांनी प्राइड ऑफ महाराष्ट्र सिझन ४ अवार्ड पटकावला. अवार्ड ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ फेम चकोरी उर्फ स्वाती शर्मा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

याआधी अनुजा भोसले यांना जागतिक अधिपरिचारिका दिनानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला येथे आदर्श परिचारिका २०२५ हा किताब देऊन सन्मानित करण्यात आले होते. आता त्या महाराष्ट्राच्या फेम महिला बनल्या आहेत.

सौ. अनुजा भोसले यांचे यश ग्रामीण तसेच वैद्यकीय क्षेत्रातील महिलांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.

read also :https://ajinkyabharat.com/maharashtra-state-current-teacher-award/