महामार्गावर डाळंबी जवळ कार पलटी एक जखमी

महामार्गावर डाळंबी जवळ कार पलटी एक जखमी

कुरणखेड – राष्ट्रीय महामार्गावर रोज अपघाताची मालिका सुरूच आहे बोरगाव मंजू पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत .

असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर डाळंबी जवळ आज दुपारी अपघात झाला यामध्ये कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

राष्ट्रीय महामार्ग 53 वर बोरगाव मंजू पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या डाळंबी गावातून जाणाऱ्या पुलावर आज ता.7 दुपारी 4 दरम्यान

Related News

कारचा अपघात झाला अकोला वरून मुर्तीजापुरच्या दिशेने जाणारी

एम.एच.30 ए.झेड, 3909 कार जात असताना टायर फुटल्याने गाडीचा अपघात झाला यामध्ये गाडी पलटी होऊन सुरक्षा भिंतीला धडकली यामध्ये

गाडीमधील शर्मा नामक एक महिला जखमी झाली तर गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच कुरणखेड येथील विर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे योगेश विजयकर,

विजय माल्टे,गोलू डवरे, शुभम कंडाळे, उमेश माल्टे,शाम राठोड,महावितरण कर्मचारी संतोष शिंदे, सोपनिल मुरूमकर,

सचिन ईगळे,यांनी जखमी महिलेला ॲम्बुलन्स च्या मदतीने अकोला खाजगी रुग्णालयात दाखल केले यासंदर्भात

बोरगाव मंजू पोलीस स्टेशनला माहिती करण्यात आली बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे ट्राफिक

विभागाचे पोलीस कर्मचारी नारायण शिंदे, पातोंड घटनास्थळी दाखल झाले होते.

Read Also : https://ajinkyabharat.com/murtijapur-basasthanakawar-anokhi-darcha-daddeh-complex/

Related News