मध्यप्रदेशातून पोटाची खडगी भरण्यासाठी आलेल्या युवकाचा अपघाती मृत्यू; कुरणखेडमध्ये हळहळ

मध्यप्रदेशातून पोटाची खडगी भरण्यासाठी आलेल्या युवकाचा अपघाती मृत्यू; कुरणखेडमध्ये हळहळ

कुरणखेड (ता. बाळापूर)पोटाची खडगी भरण्यासाठी मध्यप्रदेशातून आलेल्या 25 वर्षीय शेतमजुराचा

ताणखेड-खडका मार्गावर रात्रीच्या सुमारास दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला. राजा कासदेकर

(रा. राजनी, जि. बैतूल, म.प्र.) हा गेल्या काही वर्षांपासून कुरणखेड गावात शेतीकाम करत होता.

Related News

15 जुलै रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास काटेरी झुडपात त्याचा मृतदेह व गाडी आढळून आल्याने ही घटना उघडकीस आली.

या घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते पिंटू गोलाईत यांनी वीर भगतसिंग आपत्कालीन पथकाला दिली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मृतदेह अकोला जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पुढील तपास बोरगाव मंजू पोलीस करत आहेत.

 विशेष मुद्दे:

  • मृत युवक सुस्वभावी व मेहनती होता, गावात लोकप्रिय होता.

  • संबंधित रस्त्यावर काटेरी झुडप वाढल्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे.

  • नागरिकांनी रस्त्यावरील झुडप तातडीने हटवण्याची मागणी केली आहे.


या घटनेने शेतमजुराच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, प्रशासनाने अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पावले उचलावीत, अशी मागणी केली जात आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/vidarbha-level-abhaya-parishad-enthusiast-worker-tushar-hande-sanmanit/

Related News