अकोला (दि.१९ सप्टेंबर,२०२५)-डॉ. बाबासाहेब आंबेडकर टीचर्स असोसिएशन, अमरावती विभाग अमरावती आणि जिल्हा शाखा अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने मा. जिल्हाधिकारी अकोला यांच्या मार्फत मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांच्या कडे संविधान विरोधी जनसुरक्षा कायदा रद्द करण्याबाबत डाटा च्या वतीने निवेदन सादर करण्यात आले.
डाटा संघटना सातात्याने शैक्षणिक, सामाजिक समस्या सोडवण्यासाठी अग्रेसर असते.
नुकताचं महाराष्ट्र सरकारने राज्यात अर्बन नक्षलवादाला प्रतिबंध घालण्यासाठी आणि नक्षलवादी चळवळ नष्ट करण्याच्या हेतूने जनसुरक्षा कायदा संमत केला आहे.
वास्तवताः या कायद्याच्या विधेयकावर लोकांनी आणि पुरोगामी विचारांच्या विविध सामाजिक चळवळींच्या वतीने शेकडो हरकती, आक्षेप आणि सूचना केल्या आहेत. मात्र सरकारने त्यांची गंभीर दखल न घेता तसेच विधिमंडळात या विधेयकावर सविस्तर चर्चा न करता आवाजी मतदान पद्धतीने हे विधेयक संमत केले आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून लोकशाहीला मारक व संविधान विरोधी आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील सामान्य जनता, विचारवंत, लेखक, पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते, लोकशाही आणि संविधानावर निष्ठा असणाऱ्या लोकांनी पहिल्यापासून या विधेयकाला विरोध केलेला आहे.
परंतु शासनाने लोकांच्या विरोधाला न जुमानता त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याच्या दुष्ट हेतूने हा कायदा पारित केला आहे.करिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर टीचर्स असोसिएशन अमरावती विभाग अमरावती आणि जिल्हा शाखा अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आपणास विनंती की, आपण लोकशाही व संविधान विरोधी कायदा तातडीने रद्द करावा आणि लोकांच्या हक्कांचे संरक्षण करावे.
डाटा संघटनेच्या वतीने एकाचं वेळी अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यांमध्ये निवेदने सादर केली हे विशेष
यावेळी मार्गदर्शक डॉ. बी. एच. किर्दक,
डॉ. डि.आर खंडेराव, जिल्हाध्यक्ष डॅा प्रसेन्नजीत गवई, उपाध्यक्ष प्रा मनोहर वासनिक, प्रा राहुल माहुरे, प्रा राहुल घुगे, डॅा हरिचंद नरेटी, सचिव डॅा विनोद खैरे, कोषाध्यक्ष डॅा अशोक इंगळे, प्रा प्रकाश गवई, प्रा. अनिल निंबाळकर, डॉ. बाळकृष्ण खंडारे, डॉ. प्रीती इंगळे, डॉ. निरज अंभोरे,
प्रा. दिलीप कुमरे, प्रा. बी. बी. धारणे,
प्रा विजय चांदणे, प्रा. प्रभू भारसाकळे,
प्रा. चंद्रकांत शिरसाट, प्रा. आकाश हराळ,
प्रा. विशाल नंदागवळी उपस्थित होते.
read also :https://ajinkyabharat.com/mulinchya-vasatgriharat-jevan/
