एम आय एम तालुकाध्यक्षपदी अब्दुल आसिफ शहिद यांची नियुक्ती; तेल्हारा तालुक्यात संघटन बळकट होणार

अब्दुल आसिफ यांची तालुकाध्यक्षपदी नेमणूक; गावात चाहत्यांचा जल्लोष

अडगाव-परिसरात कार्यरत युवा कार्यकर्ते अब्दुल आसिफ अब्दुल शहिद

यांची एम आय एम  तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ही नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष असुद्दीन ओवैसी यांच्या

मार्गदर्शनाखाली व राज्याध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या

आदेशानुसार महाराष्ट्रभर एम आय एम ची संघटन मजबूत

करण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे.

नियुक्तीची पार्श्वभूमी

तालुक्यातील संघटन बांधणीसाठी आयोजित बैठकीत

राज्य उपाध्यक्ष मो युसुफ सेठ पंजानी यांनी सामाजिक

क्षेत्रात नेहमी अग्रेसर राहणारे अब्दुल आसिफ

यांना तालुकाध्यक्षपदी नियुक्ती पत्राद्वारे नेमले.

प्रतिक्रिया आणि अपेक्षा

राज्य उपाध्यक्ष मो युसुफ सेठ पंजानी यांनी म्हटले की,

“अब्दुल आसिफ यांच्या नियुक्तीमुळे तेल्हारा तालुक्यात एम आय एम चे संघटन अधिक मजबूत होईल.”

 गावातील उत्साह

अब्दुल आसिफ यांच्या नियुक्तीची बातमी समजताच

त्यांच्या चाहत्यांनी गावात जल्लोषात स्वागत केले व आनंद व्यक्त केला.

Read also :https://ajinkyabharat.com/shri-gadge-maharaj-college-tarunyavasthel-vidyarthail-vidyarthyanasathi-tanavam-free-life/