लोणार तालुक्यात ढगफुटीसारख्या पावसाने कहर

लोणार तालुक्यात ढगफुटीसारख्या पावसाने कहर

प्रतिनिधी | लोणार

लोणार तालुक्यात सोमवारी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून,

अनेक नद्या आणि नाले तुडुंब भरून घरांमध्ये पाणी शिरण्याच्या घटना समोर आल्या आहेत.

त्यामुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले असून, घरगुती साहित्याचे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

अचानक आणि मुसळधार पावसामुळे

काही ठिकाणी घरांचे मोठे नुकसान झाले आहे.

विशेषतः मंडळ क्षेत्रात पूरपरिस्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांचे पीक आणि आर्थिक नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड-जाधव यांचा तातडीने हस्तक्षेप

या परिस्थितीची गंभीर दखल घेत केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड-जाधव यांनी तातडीने हस्तक्षेप करत

जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत.

त्यांनी महसूल, कृषी विभाग तसेच पीक विमा कंपन्यांचे प्रतिनिधी यांच्यासह तात्काळ शेती व घरांच्या नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत.

पंचनाम्यासाठी यंत्रणा सज्ज, नागरिकांकडून मदतीची अपेक्षा

या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून पंचनामे करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू करण्याचे संकेत मिळाले आहेत.

दरम्यान, पीडित कुटुंबांना तात्काळ आर्थिक मदत मिळावी, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत.

Read Also : https://ajinkyabharat.com/shegaon-pandharpur-palakhi-margachi-pathetic-condition/