लोणार | प्रतिनिधी
पर्यटन स्थळ म्हणून ओळख असलेल्या लोणार शहराला स्वतःचे एसटी आगार नसल्याने
प्रवाशांना नेहमीच अडचणींचा सामना करावा लागतो. याच पार्श्वभूमीवर लोणार-पुणे बस फेरी काही काळासाठी बंद करण्यात आली होती.
मात्र, प्रवाशांच्या व नागरिकांच्या मागणीनंतर ही फेरी पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
शिवछत्र मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदुभाऊ मापारी यांनी ही फेरी पुन्हा सुरू करण्याची मागणी
प्रादेशिक व्यवस्थापक रोहन पलंगे (अमरावती), विभाग नियंत्रक (बुलडाणा), व विभागीय वाहतूक अधिकारी
(बुलडाणा) यांच्याकडे केली होती. त्यांच्या मागणीची तात्काळ दखल घेत ही फेरी दि. २३ जुलैपासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
ही बस सकाळी ७ वाजता लोणारहून सुटून, सुलतानपूर, बिबी, सिंदखेडराजा, नाव्हा,
जालना, छ. संभाजीनगर, नगर, शिरूर मार्गे पुणे येथे सायंकाळी पोहोचणार आहे.
तसेच पुण्याहूनही सकाळी ७ वाजता ही बस लोणारसाठी रवाना होईल.
या निर्णयामुळे विद्यार्थी, रुग्ण, पर्यटक व नोकरीसाठी जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
प्रवासी सेवा संघटनेचे अध्यक्ष उस्मान शेख, सचिव भागात खरात,
आणि उपाध्यक्ष अशोक काटकर यांनी नागरिकांनी या फेरीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/wadegaon-patur-rhodwar-charchakicch-driver-drisah-both-women-gambhir-wounds/