लोणार काँग्रेस कडून जन सुरक्षा कायद्याची होळी

लोणार काँग्रेस कडून जन सुरक्षा कायद्याची होळी

लोणार प्रतिनिधी

आज दिनांक 23 जुलै 2025 रोजी स्थानिक लोणार काँग्रेस कमिटी च्या वतीने महाराष्ट्र शासनाने नुकताच जन सुरक्षा कायदा पारित केलेला आहे.

त्या संदर्भात व 22 जुलै 2025 रोजी लोणार तालुक्यात ढग फुटी सदृश्य पाणी पडल्यामुळे झालेल्या शासनाने तत्काळ पंचनामे करून

मदत देण्यात यावी याकरिता लोणार शहर काँग्रेस कमिटी व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या सूचनेनुसार बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे

अध्यक्ष तथा मा.आमदार राहुल भाऊ बोंद्रे यांच्या आदेशाने लोणार शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख समद शेख अहमद,

तालुका अध्यक्ष अश्रू फुके यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात

महाराष्ट्र शासनाने नुकताच पारित केलेला जनसुरक्षा कायदा हा राज्यघटनेने नागरिकांना दिलेल्या मूलभूत अधिकारांचा संकोच करणारा असून,

तो थेट लोकशाही मूल्यांना छेद देणारा आहे. या कायद्यातील काही तरतुदी या हुकूमशाही पद्धतीची आठवण करून देतात.

जनसुरक्षा कायदा म्हणजे लोकशाहीच्या विरोधात जाणारा काळा कायदा आहे, अशा तीव्र शब्दात निषेध लोणार तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने

लोणार येथे २३ जुलै रोजी लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या जनसुरक्षा कायद्याविरोधात व कायदा पारित

करणाऱ्या राज्य सरकारच्या निषेधार्थ जनसुरक्षा कायद्याची होळी करण्यात आली.

यावेळी यांच्यासह असंख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

लोणार येथे २३ जुलै रोजी लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या जनसुरक्षा कायद्याविरोधात व कायदा पारित करणाऱ्या राज्य सरकारच्या

निषेधार्थ जनसुरक्षा कायद्याची होळी करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश धुमाळ,

माजी नगराध्यक्ष भूषण मापारी, युवा काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिकेत मापारी, अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष तोफिक कुरेशी,

माजी सभापती ज्ञानेश्वर चिभडे,माजी पंचायत समिती सदस्य सुभाष सोनोने, माझी शहराध्यक्ष नितीन शिंदे, माजी नगरसेवक संतोष मापारी,

शेख रहुफ भाई, भरत राठोड, ज्योती राठोड,शंकर हेंद्रे, माजिद कुरेशी, युवक शहराध्यक्ष विकास मोरे,फयाज खान,

अमोल सोनुने, अनिल पाटोळे, एजाज खान, मोसिन शहा, रहमान नोरंगाबादी, कृष्णा बाजाड,जावेद कुरेशी,

एकबाल कुरेशी, लोकमान कुरेशी, आप्पा शिंदे, शुभम चाटे, शंकर कोकाटे, मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

 

दिनांक 22 जुलै 2025 रोजी लोणार तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाणी पडल्यामुळे लोणार

तालुक्यात व शहरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्याची शासनाने तात्काळ पंचनामे करून मदत जाहीर करावी

२) कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधान सभेतील रमी खेळण्याच्या गैरवर्तवणुकी बद्दल

तत्काळ कृषीमंत्री पदावरून निलंबित करण्यात यावा अशी मागणी करण्यात आले

लोणार काँग्रेस कडून जन सुरक्षा कायद्याची होळी

लोणार तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाणी पडल्यामुळे झालेल्या नुकसानीचा शासनाने

तात्काळ पंचनामे करून मदत जाहीर करावी.

Read Also : https://ajinkyabharat.com/balapur-krishi-bhiticha-kahi-part-kosla/