मुंबई – सध्या सोशल मीडियावर ‘गुगल जेमिनाय रेट्रो एआय’ (Google Gemini Retro AI) फोटोंचा तुफान ट्रेंड गाजतोय. अनेक युजर्स आपले जुने फोटो एआयच्या मदतीने एडिट करून सोशल प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. यामध्ये सेलिब्रिटींच्या फोटोसुद्धा सामील होत असून त्यावरून चर्चाही रंगलेली आहे. मात्र अभिनेत्री जान्हवी कपूरने या ट्रेंडवर विरोध व्यक्त करत नवीन विचार मांडले आहेत.
नुकतीच एका मुलाखतीत जान्हवी कपूर म्हणाली,
“जेव्हा मी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ओपन करते, तेव्हा माझे अनेक फोटो एआयमध्ये एडिट करून माझ्या परवानगीशिवाय व्हायरल होत असतात. आपल्यासारख्या व्यक्तींना हे सहज ओळखता येईल, पण सर्वसामान्य लोकांना वाटू शकते की मीच हे सर्व केलंय! मी मानवी क्रिएटिव्हिटी आणि प्रामाणिकतेवर अधिक भर देते.”
जान्हवीच्या या मताला अभिनेता वरुण धवननेही साथ दिली आहे. वरुण म्हणाले,
“तंत्रज्ञान हे दोनधारी तलवारासारखे आहे. फायदे असले तरी त्याच्यासोबत नुकसानसुद्धा संभवते. अभिनेत्यांचे फोटो आणि ओळखीचा गैरवापर होणार नाही यासाठी योग्य कायदे व नियमांची आवश्यकता आहे. मानवी भावना आणि सर्जनशीलता हेच चित्रपटाला खास बनवते. कोणतंही अल्गोरिदम ते पूर्णपणे अनुकरण करू शकत नाही.”
सध्या जान्हवी कपूर आणि वरुण धवन आगामी चित्रपट ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ च्या प्रचारातही व्यस्त आहेत. सान्या मल्होत्रा, रोहित सराफ, अक्षय ओबेरॉय आणि मनीष पॉल यांच्या सहकार्याने हे चित्रपट २ ऑक्टोबर २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
read also :https://ajinkyabharat.com/aaplya-budhimatne-lokana-impressed/