अकोला मार्गे बिहारसाठी थेट रेल्वे सेवा सुरू

गेल्या अनेक वर्षेपासून थेट बिहारसाठी रेल्वे गाडी सुरु करण्याची

मागणी अकोला व परिसरातील प्रवाश्यांनी रेल्वेमंत्री यांचेकडे

निवेदनाद्वारे केली होती. गाडी क्र. २२३५८/५७ गया – एलटीटी

Related News

साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी पश्चिम विदर्भातील

अकोला जंक्शन मार्ग बिहार दरम्यान नवीन रेल्वे सेवा सुरू

झाल्याने अकोला व परिसरातील रेल्वे प्रवाशांची सोय झाल्याने

प्रवाश्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभाग मार्गे ही सेवा सुरु झाली आहे,

ज्यामुळे उत्तर प्रदेश व बिहारकडे थेट जाण्यासाठी दीर्घकाळा

पासून अपूर्ण असलेले स्वप्न पूर्ण झाले आहे. मुंबई ते हावडा

मार्गावर १,९६५ किमी अंतर असलेले भुसावळ- अकोला –

बडनेरा – वर्धा मार्गावरून उत्तर प्रदेश किंवा बिहारला थेट रेल्वे

सेवा नव्हती. या अगोदर मुंबईहून भुसावळ व वर्धा नागपुर मार्गे

बिहारला – जाणारी ही रेल्वे सेवा होतीं. आता मात्र या गाडीमुळे

पश्चिम विदर्भातील अकोला, व भुसावळ मार्गे थेट बिहार राज्यात

जाण्यासाठी सोय झाली आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/35-buses-running-in-akola-section-taklya-bhangarat/

Related News