अनेक गोष्टीप्रमाणे लालबागचा राजाही हे लोक गुजरातला नेऊ शकतात

गृहमंत्री अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यावरुन संजय राऊतांचा टोला

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आजपासून मुंबई दौऱ्यावर येत आहे.

यावेळी ते लालबागच्या गणपतीचेही दर्शन घेणार आहेत.

Related News

त्यांनी यावं, मात्र मला सारखी भीती वाटते आहे की, ज्याप्रमाणे

मुंबईतील अनेक उद्योग त्यांनी पळवले, राज्यातील अनेक संस्था

गुजरातला पळवल्या, त्याचप्रमाणे लालबागचा राजा देखील

गुजरातला पळवतील की काय, अशी शंका मला आहे.

कारण हे लोक काहीही करू शकतात. एकीकडे लालबागचा

गणपती प्रख्यात आहे. देश विदेशातून लोक तेथे येत असतात.

त्यामुळे लालबागचा राजा हे गुजरातला देखील घेऊन जातील,

असा घणाघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत

यांनी केला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आजपासून पुढील दोन दिवस

मुंबईच्या दौऱ्यावर आहे. लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी

गृहमंत्री मुंबईला येणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यावरून संजय राऊत

यांनी अमित शहांवर निशाणा साधत टीका केली आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/railway-accident-due-to-breakage-of-coupling-of-magadh-express-in-bihar/

Related News