शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे  आमदारांची पेन्शन बंद करा

माजी सैनिकाचे जिल्हा कचेरीसमोर उपोषण
अकोला : राज्य आणि केंद्र शासनाच्या सेवेतील कर्मचाऱ्यांची ज्याप्रमाणे पेंशन बंद केलेली आहे त्या प्रमाणे आमदारांची पेन्शन बंद करण्यात यावी या मागणीसाठी दिलीप सरदार या माजी सैनिकाने जिल्हा कचेरीसमोर उपोषण सुरू केले आहे.
आमदाराच्या वेतनामध्ये 50 टक्के कपात करण्यात यावी
आमदार उमेदवारी अर्ज दाखल करते वेळी जसा संपूर्ण संपत्तीचा तपशील देतात तसाच तपशील हा त्यांचा कार्यकाल संपल्यानंतर देणे बंधनकारक करावे
राज्य सेवेतील आणि केंद्रीय सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांची सरसकट पेंशन योजना सुरू करण्यात यावी.
जोपर्यंत या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आमरण उपोषण चालूच राहणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले..