Raksha Khadse : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही मुलींची मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील
संत मुक्ताई यात्रेमध्ये टवाळखोरांनी छेडछाड केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आलाय.
Raksha Khadse : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे (Raksha Khadse) यांच्या मुलीसह काही मुलींची मुक्ताईनगर
Related News
तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रेमध्ये टवाळखोरांनी छेडछाड केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस
आल्याने जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे. टवाळखोरांना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी रक्षा खडसे
आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. या प्रकरणात सात जणांविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी
आतापर्यंत तीन जणांना ताब्यात घेतले आहे. तर इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात महाशिवरात्री निमित्त आदिशक्ती मुक्ताबाईची यात्रा भरते.
या यात्रेनिमित्त कोथळी विविध कार्यक्रम पार पडतात. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची कन्या या यात्रेत फराळ वाटप करत होती.
यावेळी भोई नावाचा तरुण तिचा पाठलाग करत होता. त्यानंतर रक्षा खडसे यांची कन्या यात्रेमध्ये सायंकाळच्या वेळेस मैत्रिणीबरोबर फिरायला गेली
असता भोई नावाच्या तरुणासह काही टवाळखोरांनी तिचा पाठलाग केला. ती ज्या पाळण्यामध्ये बसत होती,
त्या पाळण्यामध्ये सुद्धा तरुण बसला. त्यानंतर काही व्हिडिओ चित्रित केले. ही बाब सुरक्षा रक्षकाच्या लक्षात येताच त्यांनी त्याला मज्जाव केला.
परंतु टवाळखोरांनी सुरक्षारक्षकाशी झटापट केली.
रक्षा खडसेंनी गाठले पोलीस ठाणे, सात जणांवर गुन्हा
यानंतर छेडछाडप्रकरणी सुरक्षारक्षकाच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला.
मात्र मुलीची आणि तिच्या मैत्रिणींची छेडछाड करणाऱ्या तरुणांना अटक न झाल्याने रक्षा खडसे आक्रमक झाल्या.
टवाळखोर तरुणांना तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी रक्षा खडसे यांनी पोलीस स्टेशनला भेट दिली.
टवाळखोरांनी ज्या मुलींची छेड काढली त्या मुलींमध्ये काही अल्पवयीन मुलींचाही समावेश आहे.
टवाळखोर व छेडखानी करुनही तरुण मोकाट असल्याने रक्षा खडसे यांनी पोलिसांना जाब विचारला.
यानंतर मुक्ताईनगर पोलिसांनी दरम्यान, अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलिसात अनिकेत भोई,
पीयूष मोरे, सोहम कोळी, अनुज पाटील, सचिन पालवे, नितीन कोळी, किरण माळी अशा सात जणांवर 354,
पोक्सो, आयटी अॅक्ट 66 (इ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऑडीओ क्लीप व्हायरल
या घटनेनंतर रक्षा खडसे व आरोपी पियुष मोरे यांचा फोनकॉल व्हायरल झाला. पियुष,
तुमच्या जुन्या गावामध्ये त्या पोरांनी मुलीचा व्हिडिओ काढला अन् तुम्ही त्याला सपोर्ट करता.
दोनवेळा तसं झालं ना, हे बघ मी तिथं आले ना धिंगाणा करेन, ती माझी पोरगीय, अशा शब्दात व्हिडिओ काढणाऱ्या
टवाळखोरांच्या मित्राशी खासदार रक्षा खडसे यांनी फोनवरून संवाद साधत इशारा दिला. ती माझी मुलगी होती,
तिच्या सुरक्षेसाठीच मी त्या लोकांना (पोलिसांना) तिथं ठेवलेय. तुम्ही फक्त त्या आमदाराचे पाय चाटायला तिथ बसलेले आहेत.
ते आमदाराचेच लोक होते ना, असेही रक्षा खडसे यांनी म्हटले. मी तुम्हा सगळ्यांना पोलिसात खेचणार आहे,
तुम्ही आमदाराकडे जा किंवा शिंदे साहेबांकडे जाग. तुझा काय अधिकार आहे, त्या पोलिसाला बोलायचा.
माझ्या मुलीच्या बाबतीत तू अस वागत असेल तर मी सोडणार नाही, अशा शब्दात त्यांनी
रोष व्यक्त केल्याचे ऑडिओ क्लीपमध्ये दिसून आले.
आरोपी शिंदे गटाचे कार्यकर्ते
यानंतर एफआयआरमधे नाव असलेले अनिकेत भोई, पियूष मोरे यांचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)
आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सोबतचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले.
तर आरोपींमध्ये समावेश असलेला अनिकेत भोई हा शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे
निकटवर्तीय असलेल्या उपजिल्हाप्रमुख छोटू भोई यांचा पुतण्या आहे. त्याच्यावर यापूर्वी गुंडगिरी,
हाणामारी करून गंभीर दुखापत करणे, यासारखे चार गुन्हे मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दाखल आहेत.
तर पीयूष मोरे हा पूर्वीचा भाजपाचा माजी नगरसेवक राहिलेला असून काही
दिवसांपूर्वी तो आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटात सहभागी झाला आहे.
तो सध्या कोणत्याही पदावर कार्यरत नाही. तर सचिन पालवे हा शिंदे गटातील युवा शहर प्रमुख म्हणून सध्या कार्यरत आहे.
या प्रकरणातील बहुतांश आरोपी हे शिवसेना शिंदे गटात पदावर नसले तरी ते शिंदे गटाचे कार्यकर्ते असल्याची माहिती समोर आली.
Read more news here :https://ajinkyabharat.com/mulichya-chhedi-diprakriti-bjps-maji-corporator-accused-sadhya-shinde-gatat/