लातूरमध्ये दिवंगत गोपीनाथ मुंडेंचा राज्यातील पहिलाच शासकीय पुतळा अनावरण; पंकजा मुंडेंच्या डोळ्यात दाटले पाणी

पुतळा

लातूरमध्ये दिवंगत गोपीनाथ मुंडेंचा राज्यातील पहिलाच शासकीय पुतळा अनावरण; पंकजा मुंडेंच्या डोळ्यात दाटले पाणी

लातूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात माजी केंद्रीय मंत्री व लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे

आज ( ११ ऑगस्ट ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

शासकीय जागेत बसवण्यात आलेला हा मुंडेंचा राज्यातील पहिलाच पुतळा असल्याचे सांगितले जात आहे.

अनावरण सोहळ्यात मंत्री पंकजा मुंडे यांनी वडिलांच्या आठवणींना उजाळा देत भावनिक भाषण केले.

“बाबांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण लोकांसाठी होता,” असे सांगताना त्यांच्या डोळ्यांत पाणी आले आणि वातावरण भावूक झाले.

या ऐतिहासिक क्षणासाठी लातूरसह परिसरातील हजारो चाहते आणि मान्यवर उपस्थित होते.

दिवंगत मुंडेंवरीललोकांच्या प्रेमाची साक्ष देणारा हा सोहळा उत्साह, भावूकता आणि अभिमानाने ओतप्रोत भरलेला होता.

Read also :https://ajinkyabharat.com/jagavchaya-pradesh-vice-president-pratibha-shinde-yancha-rajinama/