विद्यार्थ्यांच्या कला–गुणांना व्यासपीठ : स्व. मंजुळाताई कोरडे पाटील संस्थेचा स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात

कला–गुणांना

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये दडलेल्या सुप्त कला–गुणांना वाव देत शिक्षणासोबतच सांस्कृतिक विकास साधण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या स्व. मंजुळाताई कोरडे पाटील ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था, रायपूर यांच्या वतीने श्री शिवाजी विद्यालयात दिनांक १२ व १३ जानेवारी २०२६ रोजी भव्य स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवस चाललेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक, ग्रामस्थ आणि मान्यवरांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली.

स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा सौ. मीनाताई कोरडे पाटील यांच्या हस्ते सांस्कृतिक कार्यक्रमाचे विधिवत उद्घाटन करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव मा. एकनाथरावजी कोरडे पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी बोलताना सौ. मीनाताई कोरडे पाटील यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच कला, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये संधी मिळणे अत्यंत गरजेचे असल्याचे नमूद केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो व त्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो, असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला संस्थेचे संचालक रामसिंग कानडजे, सुरज कोरडे, शुभम कोरडे, सौ. रेखाताई लोखंडे, सूर्याजी सिरसाट, डॉ. बाहेती, फारुखशेट सौदागर, हिम्मतराव जाधव, बालाप्रसाद जैस्वाल, सरपंच पती सुनील देशमाने, अभिमान घोलप, नजीम शेख, नबा पाटील, एकनाथराव कंकाळ, रामराव सिरसाट, शेख बादल, सचिन जैस्वाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दोन्ही दिवशी महिला भगिनी, गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि पालकांची लक्षणीय उपस्थिती दिसून आली.

Related News

स्नेहसंमेलनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी विविध नृत्याविष्कार, समूह नृत्य, देशभक्तीपर नृत्य तसेच लोकनृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. रंगीबेरंगी वेशभूषा, तालबद्ध नृत्य आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणामुळे संपूर्ण परिसर उत्साहाने भारावून गेला होता.

या वेळी मार्गदर्शन करताना सचिव एकनाथरावजी कोरडे पाटील यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच संस्कार, शिस्त आणि कष्टाची सवय लावण्याचे महत्त्व पटवून दिले. आजचे विद्यार्थी हे उद्याचे सुजाण नागरिक असून त्यांनी आपले ध्येय स्पष्ट ठेवून मेहनतीने वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच ग्रामीण भागातील शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी. एन. जाधव  यांनी प्रभावीपणे केले. प्रास्ताविक व्हि. व्हि. सपकाळ यांनी तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक एस. पी. नप्ते यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी टी. डी. आकाळ, पी. बी. जाधव, देशमाने , सौ. लहाने मॅडम, निलेश चिंचोले, पुनम पठ्ठे, ईश्वर मुरडकर, दिलीप कुंजरगे आदी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

या स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळ्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली असून शिक्षणासोबतच सांस्कृतिक विकासालाही निश्चितच चालना मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

read also :  https://ajinkyabharat.com/manjane-yuvachacha-gala-chirla-duchakiswar-seriously-injured/

Related News