जम्मू-काश्मीरमधील जम्मू दरबारजवळील सुंजवान लष्करी छावणीवर
सोमवारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक जवान जखमी झाला.
36 इन्फ्रंट्री ब्रिगेडचे नियंत्रण असलेल्या कॅम्पमधील सॅन्ट्री पोस्ट परिसराजवळ
Related News
सालासर बालाजी मंदिरात भव्य हनुमान जन्मोत्सव; प्रयागराज कुंभमेळ्याचा देखावा विशेष आकर्षण
तेल्हारा येथे शिवसेनेची आढावा बैठक संपन्न; स्थानिक स्वराज्य निवडणुकांची जोरदार तयारी सुरू
आठवड्यातून तीन दिवस अमरावती-मुंबई विमानसेवा सुरु
नगर परिषद शिक्षक सहकारी पत संस्था अकोटच्या अध्यक्षपदी तसलीम ताहेर पटेल यांची अविरोध निवड
शतकानुशिक परंपरेची साक्ष — आसरा माता यात्रा भक्तिभावात पार
ज्ञानेश्वर वरघट पेडगाव वार्ताहर कळंबा बोडखे येथील जनतेचा पाण्यासाठी आक्रोश
अकोला रेल्वे स्टेशन परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी जेरबंद
शेतकरी आत्महत्या ग्रस्त निराधार बालकांना शिक्षणासाठी मदतीचा हात; माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते आर्थिक मदत वाटप
शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश; अकोट तालुका आढावा बैठक उत्साहात पार
सुरत कलकत्ता हायवे क्रमांक त्रेपन्न वर भीषण अपघात; कार चालक गंभीर जखमी
गौण खनिज प्रकरणात पेंडींग असलेल्या दंडाची वसुली रखडली; तहसीलदारांवर टिका
परप्रांतीय कंपन्यांची मुजोरी मोडत स्थानिकांना मिळवून दिला रोजगार….
हा हल्ला झाला. या भागात दहशतवाद्यांसाठी शोधमोहीम सुरू करण्यात
आल्याची माहिती सूत्रांनी दिली. गेल्या आठवड्यात, सुरक्षा दलांनी 31 ऑगस्ट
रोजी जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेझ सेक्टरमध्ये नियंत्रण
रेषेजवळ (LOC) घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. दहशतवाद्यांच्या हालचाली
निदर्शनास आल्यानंतर घुसखोरी करणारे दहशतवादी आणि भारतीय लष्कर
यांच्यात चकमक झाली. जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर
गेल्या आठवड्यात दोन वेगवेगळ्या चकमकीत किमान तीन दहशतवादीही
ठार झाले. भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सच्या म्हणण्यानुसार, कुपवाडाच्या
माछिल सेक्टरमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा
खात्मा केला, तर कुपवाडाच्या तंगधार सेक्टरमध्ये आणखी एका दहशतवाद्याचा
खात्मा करण्यात आला. 18 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या केंद्रशासित प्रदेशातील
विधानसभा निवडणुकांपूर्वी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये तणाव वाढला आहे.
गेल्या तीन महिन्यांत सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी कारवाया
कठोरपणे राबवल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दल
हाय अलर्टवर आहे. जम्मू-काश्मीरमध्ये निमलष्करी दलाच्या सुमारे 300 कंपन्या
निवडणूक कार्यासाठी तैनात करण्यात आल्या आहेत.
Read also: