मुख्यमंत्री शिंदे परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन

मुंबईतील

मुंबईतील प्रसिद्ध आणि नवसाला पावणारा बाप्पा अशी

लालबागच्या राजाची ख्याती आहे. या बाप्पाच्या दर्शनाला

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झाले होते. यावेळी

Related News

मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पत्नीसह मनोभावे लालबागच्या राजाचं

दर्शन घेतलं. गणेशोत्सवाचा आजचा दहावा दिवस… उद्या

राज्यभरातील बाप्पाचं विसर्जन होणार आहे. जड अंतःकरणाने

लाडक्या बाप्पाना निरोप देण्यात येणार आहे. मुंबईसह राज्यभरात

गेल्या ९ दिवसांपासून एकच धूम पाहायला मिळत आहे. मुंबईतील

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी अवघे काही तास शिल्लक

असल्याने भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. अशातच आज

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लालबागच्या राजाचं दर्शन

घेतल्याचे पाहायला मिळाले. अजित पवार हे आज लालबागचा

राजाच्या दरबारात पोहोचले असता त्यांनी मनोभावे बाप्पांचं दर्शन घेतलं.

राजाच्या चरणी नतमस्तक होताना महाराष्ट्रासाठी प्रार्थना केली.

त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आपल्या परिवारासह

लालबाग राजाच्या चरणी लीन झाल्याचे पाहायला मिळाले. मुख्यमंत्री

एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी, श्रीकांत शिंदे त्यांच्या पत्नी, मुलासह

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दाखल झाले होते.

Read also: https://ajinkyabharat.com/mns-leader-raj-thackerays-son-amit-thackeray-in-the-election-field/

Related News